हा तर 'सुपरमॅन', एका क्षणात उडाला हवेत आणि..., पाहा अफलातून कॅचचा VIDEO

हा तर 'सुपरमॅन', एका क्षणात उडाला हवेत आणि..., पाहा अफलातून कॅचचा VIDEO

हा कॅच पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवरच विश्वास बसणार नाही.

  • Share this:

सिडनी, 19 नोव्हेंबर : क्रिकेटमध्ये एखाद्या फलंदाज किंवा गोलंदाजाची कामगिरी जेवढी महत्त्वाची असते तेवढीच इतर खेळाडूंचीही. त्यामुळं कॅच विन द मॅच (झेलमुळे सामने जिंकले जातात) असे म्हटले जाते. क्रिकेटमध्ये असे प्रसंग नेहमीच घडत असतात, काही कॅच चाहत्यांना कायमचे लक्षात राहतात. असाच कॅच ऑस्ट्रेलियात घेण्यात आला. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या मार्श कपमध्ये एका युवा खेळाडूनं घेतलेल्या एका कॅचमुळे दर्शकांचा अंगावर काटे उभे राहिले.

मार्श कपमध्ये झालेल्या विक्टोरिया आणि दक्षिण ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात युवा खेळाडू कॅमरन वॅलेंटीनं (Cameron Valente Catch) अजब कॅच पकडत सगळ्यांना हैरान केले. सामन्यानंतर तर समालोचकांनी वॅलेंटी हा सुपरमॅन असल्याचे सामन्यात सांगितले.

वाचा-धोनीला रिलीज करणार का? सूत्रांच्या माहितीवर CSK ने दिलं ऑफिशिअल उत्तर

युवा खेळाडू वॅलेंटीचा शानदार कॅच

सामन्याच्या 28व्या ओव्हरमध्ये विक्टोरियाचा फलंदाज अॅरोन फिंच आणि पीटर हॅड्सकॉम्ब मैदानावर फलंदाजी करत होते. या दोन्ही फलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाला हैरान केले होते. दरम्यान तेव्हाच या ओव्हरच्या 5व्या चेंडूवर वॅलेंटीनं जबरदस्त कामगिरी केली. दक्षिण आस्ट्रेलियाचा जलद गोलंदज केन रिचर्डसननं पीटरला अतिशय धिमा चेंडू टाकला, त्यावर पीटरनं मिड ऑफवरून शॉट मारण्याचा प्रयत्न केला. वॅलेंटी चेंडूपासून थोडा दूर होता, तरी हवेत उडी घेत हा कॅच घेतला. या कॅचचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एवढेच नाही तर वॅलेंटीच्या कॅचनं त्याच्या संघालाही फायदा झाला.

वाचा-VIDEO: पॉल अ‍ॅडम्सचे 2019 मधील व्हर्जन; गोलंदाजी पाहून तुम्ही व्हाल हैराण

वाचा-मिशन IPL 2020! रोहितसाठी धोक्याची घंटा, संघातील स्टार खेळाडू अजूनही जखमी

कोण आहे कॅमरन वॅलेंटी

कॅमरन वॅलेंटी फक्त 25 वर्षांचा आहे, त्यानं 3 वर्षांआधी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. एवढेच नाही तर कॅमरन ऑस्ट्रेलियाकडून अंडर-19 वर्ल्ड कपही खेळला आहे. वॅलेंटीला सध्या चांगला युवा खेळाडू मानले जाते. अ श्रेणी क्रिकेटमध्ये 34 विकेट घेतले आहेत, तर 546 धावा केल्या आहेत. त्याच्यानावावर दोन शतकांचीही नोंद आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2019 01:07 PM IST

ताज्या बातम्या