मुंबई, 19 नोव्हेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून जवळजवळ एका महिन्याचा कालावधी उलटला आहे. असे असले तरी अजूनही राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. परिणामी महाराष्ट्रात सध्या राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. एकीकडे सर्वात मोठा पक्ष असेलल्या भाजपला सेनेची साथ न मिळाल्यामुळे सरकार स्थापन झाले नाही. तर दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या हलचाली सुरु आहेत. दरम्यान मागील महिन्याभरापासून राज्यात सुरु असलेल्या या गुऱ्हाळमुळे जनता त्रस्त झाली आहे, त्याचे पडसाद आता ट्विटरवर उमटू लागले आहेत. यातच आता महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवटीचे इंग्लंड कनेक्शन सर्वांसमोर आले आहे. खरतर 2014मध्येच इंग्लंडच्या एका खेळाडूनं मुंबईमध्ये अशी परिस्थिती निर्माण होईल असे अजब भाकित केले होते. इंग्लडचा युवा गोलंदाज जोफ्रा आर्चरचे हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. जोफ्रानं 2014मध्ये मुंबईयासाठीच लायक आहे, असे ट्वीट केले होते. त्यानंतर सर्वांनी आर्चरच्या या ट्वीटचा संबंध महाराष्ट्रातील सध्याच्या सत्तास्थापनेच्या चढाओढीशी लावला. याधीही अनेकदा मोठी घटना घडल्यानंतर जोफ्रा आर्चरचे ट्वीट व्हायरल झाले होते. वाचा- थोरातांसमोर ‘धर्म’संकट! मतदारसंघातूनच काँग्रेसच्या भूमिकेला विरोध
Mumbai deserve it
— Jofra Archer (@JofraArcher) May 25, 2014
जोफ्राच्या या ट्वीटवर लोकांनी ‘आर्चर तुम भगवान है’, असे मजेशीर ट्वीट केले आहे. तर काही चाहत्यांनी, तुला हे ही ठाऊक होतं का?’ असा प्रश्न आर्चरला विचारला आहे. वाचा- सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सरसंघचालकांचा भाजप-सेनेला सल्ला!
Bhai ko sab pata hota hai
— Pratik Saodekar (@Pratik_saodekr1) November 11, 2019
वाचा- राज्यपालांकडून शेतकऱ्यांची थट्टा.. काँग्रेस सेवादलाने दिली ही ‘अनोखी’ भेट काय आहे नक्की आर्चरच्या ट्वीटमागचे कारण एकीकडे आर्चरच्या या ट्वीटचे वेगवेगळे अर्थ लावले जात असताना एका चाहत्यानं खरा संदर्भ सांगितला आहे. जोफ्रानं हे ट्वीट आयपीएल दरम्यान केले होते. त्यावेळी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला होता. या सामन्यात मुंबईनं 189 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थाननं हे आव्हान 14.3 षटकार पार केले होते. त्यावेळी आर्चरनं रागात हे ट्वीट केले होते. दरम्यान याआधीही कलम 370 रद्द झाल्यानंतर, वर्ल्ड कप दरम्यान जोफ्राचे ट्वीट व्हायरल झाले होते

)







