मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

बांगलादेशविरुद्ध पराभवानंतर ICCचा भारताला आणखी एक दणका, रोहितने मान्य केली चूक

बांगलादेशविरुद्ध पराभवानंतर ICCचा भारताला आणखी एक दणका, रोहितने मान्य केली चूक

भारताने दिलेल्या 187 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना बांगलादेशचे 9 गडी 136 धावांवर बाद झाले होते. अखेरच्या जोडीने भारतीय गोलंदाजांचा सामना करत 50 धावांपेक्षा जास्त भागिदारी करत संघाला विजय मिळवून दिला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Yadav

मीरपूर, 05 डिसेंबर : भारतीय क्रिकेट संघाला बांगलादेशविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यातील पहिल्या लढतीत पराभव पत्करावा लागला. नाणेफेक गमावल्यानतंर भारताला प्रथम फलंदाजीला पाचारण करण्यात आले होते. बांगलादेशने भारतीय संघाला 186  धावात रोखले. यानंतर 187 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशची अवस्था 137 धावांवर 9 विकेट गमावल्या होत्या. त्यानंतरही बांगलादेशने सामना जिंकून मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली आहे. या पराभवानंतर टीम इंडियाला आय़सीसीने आता आणखी एक दणका दिला आहे.

मीरपूर एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला पराभवानंतर आयसीसीने मोठा दंड केला आहे. थोडाथोडका नाही तर सामन्याच्या मानधनाच्या 80 टक्के रकमेचा दंड भारतीय संघाला करण्यात आला आहे. सामन्यावेळी संथ गतीने षटके टाकल्यामुळे हा दंड करण्यात आलाय. सर्व खेळाडुंच्या सामन्याच्या मानधनातील मोठ्या रकमेतून दंड कपात करून घेतला जाईल.

हेही वाचा : पोलंड फिफातून आऊट, गोलिकीपरच्या ४ वर्षांच्या चिमुकल्याला अश्रू अनावर; VIDEO VIRAL

आयसीसीच्या एलिट पॅनेलमध्ये असलेले मॅच रेफरी रंजन मदुगले यांनी भारतीय संघ निर्धारित वेळेत षटके टाकू शकला नसल्याचं म्हटलंय. भारतीय संघाने निर्धारित ओळेत चार षटके कमी टाकल्याचं मैदानी पंच आणि मॅच रेफ्री यांना आढळून आलं. भारतीय संघ आय़सीसीच्या आचरसंहिता 2.22 नुसार दोषी आढळला असून सर्व खेळाडुंना एका षटकासाठी 20 टक्के म्हणजेच 4 षटकासाठी एकूण सामन्याच्या मानधनाच्या 80 टक्के दंड होणार आहे. कर्णधार रोहित शर्माने याप्रकरणी चूक मान्य केली असून यावर सुनावणी झाली नाही.

हेही वाचा : बेन स्टोक्सच्या चक्रव्यूहात पाकिस्तानचे फलंदाज असे अडकले, पाहा VIDEO

भारताने दिलेल्या 187 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना बांगलादेशचे 9 गडी 136 धावांवर बाद झाले होते. अखेरच्या जोडीने भारतीय गोलंदाजांचा सामना करत 50 धावांपेक्षा जास्त भागिदारी करत संघाला विजय मिळवून दिला. मेहदी हसन मिराज आणि मुस्तफिजूर रहमान यांनी 46 व्या षटकापर्यंत मैदानावर टिकून राहत 1 गडी राखून विजय मिळवून दिला.

First published:

Tags: Bangladesh, Cricket, Rohit sharma, Team india