जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / पोलंड फिफातून आऊट, गोलिकीपरच्या ४ वर्षांच्या चिमुकल्याला अश्रू अनावर; VIDEO VIRAL

पोलंड फिफातून आऊट, गोलिकीपरच्या ४ वर्षांच्या चिमुकल्याला अश्रू अनावर; VIDEO VIRAL

पोलंड फिफातून आऊट, गोलिकीपरच्या ४ वर्षांच्या चिमुकल्याला अश्रू अनावर; VIDEO VIRAL

फ्रान्सने पोलंडवर ३-१ अशा गोल फरकाने विजय मिळवला. तर या पराभवानंतर पोलंडचा गोलिकीपर वोएशेख स्टेंशनेच्या चार वर्षांच्या चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 05 डिसेंबर : फिफा वर्ल्ड कप २०२२ मध्ये रविवारी पोलंड आणि फ्रान्स यांच्यात प्री क्वार्टर फायनल सामना झाला. यामध्ये फ्रान्सने पोलंडवर ३-१ अशा गोल फरकाने विजय मिळवला. तर या पराभवानंतर पोलंडचा गोलिकीपर वोएशेख स्टेंशनेच्या चार वर्षांच्या चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पराभवानंतर हमसून रडणाऱ्या या चिमुकल्याच्या व्हिडीओनंतर आमच्याही डोळ्यात पाणी आलं अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. फ्रान्सकडून किलियान एम्बाप्पेने दोन गोल नोंदवले. यंदाच्या फिफा वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत एम्बाप्पे अव्वल स्थानी आहे. हेही वाचा :  इंग्लंडने पहिली कसोटी जिंकली, पाकिस्तानचा 74 धावांनी पराभव

जाहिरात

पोलंडने सामना गमावताच स्टेंशनेचा चार वर्षांचा मुलगा लियाम रडायला लागला. सामन्यानंतर लियामला रडताना पाहून स्टेंशनेनं त्याला कुशीत घेत शांत करण्याचा प्रयत्न केला. आता सोशल मीडियावर बापलेकांचा हा भावूक व्हिडीओ शेअर केला जात आहे. हेही वाचा :  एम्बाप्पेने केली मेस्सीशी बरोबरी, पेले-रोनाड्लो यांना टाकले मागे फ्रान्सकडून ४४ व्या मिनिटाला ओलाइव्हर गिराउडने पहिला गोल केला होता. त्यानतंर ७४ व्या मिनिटाला एम्बाप्पेनं दुसरा गोल केला. त्यानंतर तिसरा गोल करत एम्बाप्पेने फ्रान्सच्या विजयावर जवळपास शिक्कामोर्तब केलं होतं. अखेरच्या क्षणी पोलंडकडून एकमेव रॉबर्ट लेवांडोवस्कीने गोल केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात