मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs AUS : ऋषभ पंत राजकोट वनडेमधून बाहेर! 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

IND vs AUS : ऋषभ पंत राजकोट वनडेमधून बाहेर! 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

17 जानेवारी रोजी होणारा दुसरा एकदिवसीय सामना भारतासाठी करो वा मरो असणार आहे.

17 जानेवारी रोजी होणारा दुसरा एकदिवसीय सामना भारतासाठी करो वा मरो असणार आहे.

17 जानेवारी रोजी होणारा दुसरा एकदिवसीय सामना भारतासाठी करो वा मरो असणार आहे.

राजकोट, 16 जानेवारी : भारतील संघाचा विकेटकीपर ऋषभ पंत 17 जानेवारी रोजी होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर पडला आहे. याआधी झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात डोक्याला चेंडू लागल्यामुळं पंतला विकेटकिपींग करता आली नव्हती. त्यामुळं पहिल्या सामन्यात केएल राहुलनं ही जबाबदारी सांभाळली होती. मात्र आता राजकोट येथे होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऋषभ पंत सामिल होणार नाही आहे. तर, पंत बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीला रवाना होईल.

17 जानेवारी रोजी होणारा दुसरा एकदिवसीय सामना भारतासाठी करो वा मरो असणार आहे. कारण पहिल्या सामन्यात पराभव मिळाल्यामुळं ऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0ने आघाडी घेतली आहे. त्यामुळं राजकोटमध्ये होणारा सामना भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

वाचा-अभिनेत्रीच्या मदतीने भारतीय क्रिकेटपटूंना हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न

पॅट कमिन्स चेंडूनं झाली दुखापत

भारताच्या डावातील 44 व्या षटकात पॅट कमिन्सचा चेंडू ऋषभ पंतच्या हेल्मेटवर आदळला. चेंडू बॅटची कड घेऊन हेल्मेटला लागला आणि अॅश्टन टर्नरने झेल घेतला. पंत बाद होऊन मैदानातून परतत असताना तो ठिक नसल्याचे दिसत होते. त्याला चक्कर येत असल्यानं त्याची कन्कशन टेस्ट घेण्यात आली. त्यामुळे पुन्हा ऋषभ पंत खेळण्यासाठी मैदानात आला नाही. दरम्यान, तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने सहज जिंकला. भारताचा संघ 255 धावाच करू शकला. भारताकडून सर्वाधिक सलामीवीर शिखर धवनने 74 धावा केल्या. त्याच्यानंतर केएल राहुलने 61 चेंडूत 47 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने 3 तर पॅट कमिन्स आणि केन रिचर्डसन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

वाचा-ऋषभ पंत रात्रभर डॉक्टरांच्या देखरेखीखाली, चेंडू डोक्याला लागल्याने आली होती भोवळ

पंतवर उपचार सुरू

बीसीसीआयने म्हटलं की,'पंत सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून तज्ज्ञांचा सल्ला घेतला आहे. त्याचाबद्दलचे अपडेट दिले जातील.' चेंडू डोक्याला लागल्यानंतर पंत चालत मैदानाबाहेर गेला. त्याला लगेच उपचाराची गरज पडली नाही. मात्र, दोन्ही डावांच्या दरम्यान ब्रेकवेळी त्याला भोवळ आल्यानंतर टेस्ट घेण्यात आली.

वाचा-हार्दिक पांड्याच्या प्रेयसीने शेअर केला बिकिनीतला फोटो, सोशल मीडियावर झाला हीट

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात होणार बदल

ऋषभ पंत दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर गेल्यानंतर आता भारताच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये मोठे बदल होऊ शकतात. त्यामुळं पंतच्या जागी सहाव्या क्रमांकावर केदार जाधवला संधी मिळू शकते. केदार जाधवने सहाव्या क्रमांकावर फलंदाजीचे रेकॉर्ड चांगले आहे. केदारनं 39 सामन्यात 50.63च्या सरासरीनं 962 धावा केल्या आहेत. यात दोन शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. सहाव्या क्रमांकावर केदारनं 120 धावांची सर्वोत्तम खेळीही केली आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket