मुंबई, 15 जानेवारी : ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात भारताचा दहा गडी राखून पराभव केला. या सामन्यात फलंदाजी करताना भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत जखमी झाला. त्याच्या डोक्याला चेंडू लागल्याने तो यष्टीरक्षणासाठी मैदानावर उतरला नाही. त्याच्या जागी केएल राहुलने यष्टीरक्षण केलं. ऋषभ पंतच्या तब्येतीबाबत बीसीसीआयने माहिती दिली आहे. हेल्मेटवर चेंडू लागल्यानं पंतची तपासणी केली आहे. आता त्याच्यावर उपचार सुरू आहे. पंतच्या जागी मनिष पांडे क्षेत्ररणासाठी मैदानात उतरला. पंतने या सामन्यात 32 चेंडूत 28 धावा काढल्या. भारताच्या डावातील 44 व्या षटकात पॅट कमिन्सचा चेंडू ऋषभ पंतच्या हेल्मेटवर आदळला. चेंडू बॅटची कड घेऊन हेल्मेटला लागला आणि अॅश्टन टर्नरने झेल घेतला. पंत बाद होऊन मैदानातून परतत असताना तो ठिक नसल्याचे दिसत होते. त्याला चक्कर येत असल्यानं त्याची कन्कशन टेस्ट घेण्यात आली. त्यामुळे पुन्हा ऋषभ पंत खेळण्यासाठी मैदानात आला नाही.
Update: Rishabh Pant has got a concussion after being hit on his helmet while batting. KL Rahul is keeping wickets in his absence. Pant is under observation at the moment. #TeamIndia #INDvAUS pic.twitter.com/JkVElMacQc
— BCCI (@BCCI) January 14, 2020
बीसीसीआयने म्हटलं की,‘पंत सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून तज्ज्ञांचा सल्ला घेतला आहे. त्याचाबद्दलचे अपडेट दिले जातील.’ चेंडू डोक्याला लागल्यानंतर पंत चालत मैदानाबाहेर गेला. त्याला लगेच उपचाराची गरज पडली नाही. मात्र, दोन्ही डावांच्या दरम्यान ब्रेकवेळी त्याला भोवळ आल्यानंतर टेस्ट घेण्यात आली. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने सहज जिंकला. भारताचा संघ 255 धावाच करू शकला. भारताकडून सर्वाधिक सलामीवीर शिखर धवनने 74 धावा केल्या. त्याच्यानंतर केएल राहुलने 61 चेंडूत 47 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने 3 तर पॅट कमिन्स आणि केन रिचर्डसन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. ‘या’ 5 कारणांमुळे टीम इंडियाला घ्यावे लागले ऑस्ट्रेलियापुढे लोटांगण