मुंबई, 15 जानेवारी : बॉलीवूडची एक अभिनेत्री तीन सट्टेबाजांसोबत संपर्कात असल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तीन सट्टेबाजांची गेल्या काही दिवसांत अनेकदा दुबईत भेट घेतली आहे. यात तीन सट्टेबाजांनी तिला काही क्रिकेटपटूंना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याची जबाबदारी दिली होती. काही सामन्यांमध्ये फिक्सिंग करण्यासाठी हनीट्रॅपचा वापर करण्यासाठी असं केलं होतं.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्रीने दोन भारतीय क्रिकेटपटूंशी मैत्री वाढवण्याचा प्रयत्न केला होता. दोन्ही क्रिकेटपटूंनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं. सट्टेबाजांशी संबंध असण्याचा संशय आल्यानेच क्रिकेटपटूंनी तिच्याशी मैत्री करणं टाळल्याचं म्हटलं जात आहे.
जे तीन सट्टेबाज अभिनेत्रीच्या संपर्कात आहेत त्यातील एक मध्य प्रदेशातील जबलपूरचा आहे. तर दोन गुजरातमधील खंबाटचे आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ते दुबईत बसून सट्टेबाजार चालवत आहेत. भारतीय तपास यंत्रणांच्या तावडीत सापडू नये यासाठी त्यांनी दुबईत ठाण मांडले आहे.
भारतीय क्रिकेटपटूंशी मैत्री करताना ती अशी कर की त्यांच्या ड्रेसिंग रूमपर्यंत पोहचता येईल असं सट्टेबाजांनी अभिनेत्रीला सांगितल्याचं समजते. ड्रेसिंग रुममध्ये सामन्याआधी आणि सामन्यावेळची माहिती तिला समजावी. त्यानंतर ती सट्टेबाजांना तिने द्यावी यासाठी तिला असं सांगण्यात आलं होतं. या अभिनेत्रीने दोन्ही क्रिकेटपटूंसोबत अनेकदा चर्चा केली आणि त्यांच्यासोबत फोटोही काढून घेतले आहेत.
ऋषभ पंत रात्रभर डॉक्टरांच्या देखरेखीखाली, चेंडू डोक्याला लागल्याने आली होती भोवळ
सट्टेबाजांशी भेट ही योगायोग असू शकतो पण तीन तीन सट्टेबाजांना भेटण्याने प्रश्न उपस्थित होतात. सट्टेबाजांच्या संपर्कात असल्यानं आतापर्यंत कित्येक क्रिकेटपटूंवर कारवाई झाली आहे. चार महिन्यांपूर्वी बांगलादेशचा क्रिकेटपटू शाकिब अल हसनवर बंदी घालण्यात आली होती.
हार्दिक पांड्याच्या प्रेयसीने शेअर केला बिकिनीतला फोटो, सोशल मीडियावर झाला हीट मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.