Home /News /sport /

हार्दिक पांड्याच्या प्रेयसीने शेअर केला बिकिनीतला फोटो, सोशल मीडियावर झाला हीट

हार्दिक पांड्याच्या प्रेयसीने शेअर केला बिकिनीतला फोटो, सोशल मीडियावर झाला हीट

हार्दिक आणि नताशा या दोघांनी 1 जानेवारी 2020 ला दुबईमध्ये गुपचूप साखरपुडा उरकला

  मुंबई, 14 जानेवारी :  भारतीय क्रिकेटर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि त्याची प्रेयसी नताशा स्‍टानकोविच (Natasha Stankovic) सोबत समुद्रकिनाऱ्यावरील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत नताशा बिकिनीमध्ये आहे तर हार्दिक सुद्धासोबत आहे. या दोघांचा हा हॉट अवतार त्यांच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. हार्दिक आणि नताशा या दोघांनी 1 जानेवारी 2020 ला दुबईमध्ये साखरपुडा उरकला. नताशा ही एक मॉडेल आहे. नताशा आणि हार्दिकच्या या फोटोला तब्बल 3.75 लाखांहुन अधिक लाइक मिळाले आहे. या फोटोच्या कॅप्शनला नताशाने 'पुरानी यादें हार्दिक पंड्या.' असं लिहिलं आहे. नताशा सर्बियन मॉडेल असून बिग बॉस या रिअलिटी शोमध्येही तिनं काम केले आहे. रॅपर बादशाहसोबत एका गाण्यात दिसली होती. नताशाने काही बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केले आहे.
  View this post on Instagram

  Forever yes ❤️ @hardikpandya93

  A post shared by Nataša Stanković (@natasastankovic__) on

  तर, दुसरीकडे हार्दिक पांड्या सध्या दुखापतीमुळं क्रिकेट खेळू शकत नाही आहे. त्यामुळं बांगलादेश, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका दौऱ्यात त्याला संधी मिळालेली नाही. हार्दिकनं शेवटचा टी-20 सामना दक्षिण आफ्रिकाविरुद्ध 2019मध्ये खेळला होता.
  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: Cricket

  पुढील बातम्या