सिडनी, 27 नोव्हेंबर : भारत-ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील दौऱ्याला आजपासून सुरुवात होणार आहे. या दोन्ही संघांमध्ये आज सिडनी क्रिकेट ग्राऊंड (SCG) वर पहिला सामना खेळवला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9.10 मिनिटांनी सुरू होईल. मात्र या सामन्याआधीच टीम इंडियाला सगळ्यात मोठा झटका बसला आहे. बीसीसीआयनं दिलेल्या माहितीनुसार, इशांत शर्मा (Ishant Sharma) फिट नसल्यामुळे तो ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाहेर गेला आहे. तर, रोहित शर्मा (Rohit Sharma) NCAमध्ये ट्रेनिंग घेत आहे. रोहित दौऱ्यावर येणार की नाही, याबाबत अंतिम निर्णय 11 डिसेंबर रोजी घेण्यात येईल.
भारत-ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात तब्बल 8 महिन्यांनी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला जाणार आहे. यादरम्यान टीम इंडियात मोठा बदल करण्यात आला आहे. 8.30 वाजता दोन्ही संघांमध्ये टॉस होईल, मात्र त्याआधी बीसीसीआयनं भारतीय संघात टी. नटराजनला (T Natrajan) सामिल केले आहे. नटराजनला नवदीप सैनीचा (Navdeep Saini) रिझर्व्ह खेळाडू म्हणून संघात घेतले आहेत.
वाचा-IND vs AUS : प्रत्येक मॅचमध्ये या खेळाडूंना खेळवणार नाही, विराटने दिले संकेत
NEWS - T Natarajan added to India’s ODI squad
— BCCI (@BCCI) November 26, 2020
The All-India Senior Selection Committee has added T Natarajan to India’s squad for three-match ODI series against Australia starting Friday.
Updates on Rohit Sharma and Ishant Sharma's fitness here - https://t.co/GIX8jgnHvI pic.twitter.com/VuDlKIpRcL
बीसीसीआयनं नटराजनला एकदिवसीय संघात सामिल केले असून रोहित शर्मा आणि इशांत शर्मा यांच्याबाबतही मोठी अपडेट दिली आहे. रोहित आणि इशांत एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत सामिल होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. तर इशांत शर्मा कसोटी मालिकाही खेळू शकणार नाही आहे. इशांत शर्मा फिट नसल्यामुळे तो ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाहेर गेला आहे. तर, रोहित शर्माच्या फिटनेसबाबत 11 डिसेंबर रोजी निर्णय घेण्यात येईल.
वाचा-IND vs AUS : हा खेळाडू घेईल रोहितची जागा, ऑस्ट्रेलियन कर्णधाराला भीती
बोर्डनं दिलेल्या माहितीनुसार, रोहित शर्माच्या वडिलांना कोरोनाची लागण झाल्यामुळे तो भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येऊ शकला नाही. आयपीएलचा अंतिम सामना संपल्यानंतर रोहित शर्मा भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियाला रवाना झाला होता. मात्र आता त्याच्या वडिलांच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे.
भारताचा एकदिवसीय संघ- विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शर्मी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, टी नटराजन.