जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs AUS : प्रत्येक मॅचमध्ये या खेळाडूंना खेळवणार नाही, विराटने दिले संकेत

IND vs AUS : प्रत्येक मॅचमध्ये या खेळाडूंना खेळवणार नाही, विराटने दिले संकेत

IND vs AUS : प्रत्येक मॅचमध्ये या खेळाडूंना खेळवणार नाही, विराटने दिले संकेत

ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये सगळ्या खेळाडूंना सगळ्या मॅच खेळून देणार नसल्याचं वक्तव्य कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने केलं आहे. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohammad Shami) या दोन्ही फास्ट बॉलरवर येणारा ताण पाहता आणि त्यांना चांगल्या लयीमध्ये ठेवण्यासाठी त्यांना ठराविक कालावधीनंतर आराम दिला जाऊ शकतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

सिडनी, 27 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये सगळ्या खेळाडूंना सगळ्या मॅच खेळून देणार नसल्याचं वक्तव्य कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने केलं आहे. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohammad Shami) या दोन्ही फास्ट बॉलरवर येणारा ताण पाहता आणि त्यांना चांगल्या लयीमध्ये ठेवण्यासाठी त्यांना ठराविक कालावधीनंतर आराम दिला जाऊ शकतो, असे संकेत विराटने दिले. इशांत शर्माला दुखापत झाल्यामुळे बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्यावर टेस्ट सीरिजमध्ये जास्त जबाबदारी असेल, त्यामुळे या दोघांना मर्यादित ओव्हरच्या सीरिजमध्ये काही मॅच आराम दिला जाऊ शकतो. सिडनीमध्ये होणाऱ्या पहिल्या वनडेआधी बोलताना विराट म्हणाला, ‘यासाठी जास्त डोकं लावण्याची गरज नाही. ते दोघंही संपूर्ण आयपीएल खेळले आहेत. त्यांच्यावर येत असलेला तणाव बघणंही गरजेचं आहे. वेगवेगळ्या वातावरणात खेळाडू कसे खेळतात, हे बघितलं गेलं पाहिजे. संतुलन कायम ठेवण्यात मागची काही वर्ष आम्ही यशस्वी राहिलो.’ ‘याच कारणामुळे आमचे बॉलर फिट आहेत आणि महत्त्वाच्या मॅचसाठी उपलब्ध राहिले. कर्णधार म्हणून माझ्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. या दोन्ही सीरिजसाठी युवा खेळाडूंना संधी दिली जाईल. याबाबत आम्ही बोललो आहे. टीममध्ये बरेच युवा खेळाडू आहेत. त्यांच्यासाठी नवीन काही तरी करण्याची ही चांगली संधी आहे. युवा खेळाडूंसाठी ही महत्त्वाची सीरिज असेल,’ अशी प्रतिक्रिया विराटने दिली. ‘पहिल्या टेस्ट मॅचनंतर मी भारतात परतणार आहे. याबाबतचा निर्णय टीम निवडीआधीच मी सांगितला होता. दोन्ही ठिकाणी क्वारंटाईन होणं गरजेचं असल्याचाही परिणाम झाला. पहिल्या बाळाच्या जन्मावेळी मला पत्नीसोबत राहायचं आहे. हा आमच्या आयुष्यातला खूप खास क्षण आहे, याच कारणामुळे मी न खेळण्याचा निर्णय निवड समितीला कळवला,’ असं विधान विराटने केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात