मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs AUS : हा खेळाडू घेईल रोहितची जागा, ऑस्ट्रेलियन कर्णधाराला भीती

IND vs AUS : हा खेळाडू घेईल रोहितची जागा, ऑस्ट्रेलियन कर्णधाराला भीती

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या वनडे सीरिजला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. या सीरिजमध्ये भारतीय टीम रोहित शर्मा (Rohit Sharma) शिवाय मैदानात उतरणार आहे. हितच्या अनुपस्थितीमध्ये त्याची जागा घ्यायला टीम इंडियामध्ये अनेक लायक खेळाडू असल्याचं मत ऑस्ट्रेलियाच्या वनडे टीमचा कर्णधार एरॉन फिंच (Aron Finch) याने मांडलं आहे.

पुढे वाचा ...

सिडनी, 26 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या वनडे सीरिजला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. या सीरिजमध्ये भारतीय टीम रोहित शर्मा (Rohit Sharma) शिवाय मैदानात उतरणार आहे. आयपीएल (IPL 2020) दरम्यान रोहित शर्माला दुखापत झाली होती. रोहितच्या अनुपस्थितीमध्ये त्याची जागा घ्यायला टीम इंडियामध्ये अनेक लायक खेळाडू असल्याचं मत ऑस्ट्रेलियाच्या वनडे टीमचा कर्णधार एरॉन फिंच (Aron Finch) याने मांडलं आहे. रोहितच्या गैरहजेरीत शिखर धवन आणि मयंक अग्रवाल ओपनिंगला खेळण्याची शक्यता आहे.

मॅचच्या आधी एक दिवस झालेल्या ऑनलाईल पत्रकार परिषदेत बोलताना एरॉन फिंच म्हणाला, 'रोहित सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे आणि तो आमच्याविरुद्ध यशस्वीही राहिला. रोहितला दुखापत होण्याचं दु:ख आहे, कारण तुम्ही नेहमीच विरोधी टीमच्या सर्वोत्तम खेळाडूविरुद्ध खेळू इच्छिता. पण रोहितऐवजी त्यांच्या टीममध्ये चांगले खेळाडू आहेत. मयंक अग्रवाल चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि तोदेखील उत्तम खेळाडू आहे'.

फिंच आयपीएलमध्ये विराट कोहली (Virat Kohli) सोबत बँगलोरच्या टीमकडून खेळला. याबाबतही फिंचला प्रश्न विचारण्यात आला. 'विराटमध्ये जास्त कमजोरी नाहीत, त्याचं रेकॉर्ड पाहा. आम्हाला त्याची विकेट घ्यावी लागेल, कारण विराट वनडेचा सर्वोत्तम बॅट्समन आहे,' असं फिंच म्हणाला.

मिचेल मार्शला दुखापत झाली असली तरी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीमबाबत संतुष्ट आहे, कारण त्यांच्याकडे ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टॉयनिस यांच्यासारखे ऑलराऊंडर आहेत. 'आमच्या टीममध्ये संतूलन आहे. मॅक्सवेल टी-20 क्रिकेटमध्ये धमाका करू शकतो, त्याची बॉलिंगही सुधारली आहे. स्टॉयनिसही शेवटच्या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग करायला शिकला आहे,' असं फिंचला वाटतं.

कोरोनाच्या संकटात खेळाडू जैव सुरक्षित वातावरणात राहत आहेत, त्यामुळे त्यांना शारिरिक आणि मानसिकदृष्ट्या कसं वाटतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रत्येकाची तयारी आणि काम वेगळं आहे, त्यामुळे त्यावर लक्ष ठेवलं गेलं पाहिजे, असं फिंच म्हणाला. बऱ्याच कालावधीनंतर स्टेडियममध्ये प्रेक्षकांना सामने बघता येणार आहेत, त्यामुळे रोमांच वाढला असल्याचंही फिंचला वाटत आहे.

First published:
top videos