मुंबई, 02 ऑक्टोबर: सचिन तेंडुलकरच्या इंडिया लीजंड्स संघानं काल पुन्हा एकदा रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज या दिग्गजांच्या टी20 स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. सचिनच्या नेतृत्वात इंडिया लीजंड्सनं मिळवलेलं हे सलग दुसरं विजेतेपद ठरलं. गेल्या वर्षीही भारतानं श्रीलंकेचा पराभव करुन ही स्पर्धा जिंकली होती. यंदाही भारतीय क्रिकेटमधल्या दिग्गजांनी त्याच कामगिरीची पुनरावृत्ती केली. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजची फायनल या मोसमातही भारत आणि श्रीलंका याच दोन संघात रंगली. त्यात इंडिया लीजंड्सनं श्रीलंकन लीजंड्सचा 33 धावांनी पराभव करुन विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. सचिनचं पठाण बंधूंसोबत सेलिब्रेशन स्पर्धा जिंकल्यानंतर इंडिया लीजंड्सच्या ड्रेसिंगरुममध्ये जोरदार सेलिब्रेशन झालं. कॅप्टन सचिन तेंडुलकरने संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केलेल्या पठाण बंधूंसोबतही विजयाचं सेलिब्रेशन केलं. याचा एक व्हिडीओही नुकताच समोर आला आहे. या व्हिडीओत सचिनच्या दोन्ही बाजूला इरफान पठाण आणि युसूफ पठाण उभे आहेत. आणि त्यांच्या हातात विजेतेपदाची ट्रॉफी दिसत आहे. इरफान पठाणणं हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्याखाली त्यानं कॅप्शन दिलंय… ‘बॅगमध्ये आणखी एक ट्रॉफी जमा’
One more trophy in the bag. @sachin_rt @iamyusufpathan #IndiaLegends pic.twitter.com/yj8ZvsZX6a
— Irfan Pathan (@IrfanPathan) October 2, 2022
नमन ओझाची निर्णायक कामगिरी स्पर्धेच्या सेमीफायनल आणि फायनलमध्ये इंडिया लीजंड्सच्या विजयात मोलाची भूमिका बजावली ती विकेट किपर बॅट्समन नमन ओझानं. त्यानं सेमीफायनलमध्ये 90 धावांची खेळी केली होती. तर फायनलमध्येही त्यानं शतक झळकावलं. नमन ओझाच्या 108 धावांच्या खेळीमुळे इंडिया लीजंड्सनं 20 ओव्हरमध्ये 195 धावा स्कोअरबोर्डवर लावल्या. त्यात विनय कुमारचाही 36 धावांचा वाटा होता. हेही वाचा - Ind vs SA: काय झाडी, काय डोंगर, काय स्टेडियम… गुवाहाटीत टीम इंडियाचं रेकॉर्ड एकदम ओके! 195 धावांचं आव्हान घेऊन उतरलेल्या श्रीलंकेचा डाव 19 व्या ओव्हरमध्ये 162 धावातच संपुष्टात आला. ईशान जयरत्नेनं सर्वाधिक 51 धावांचं योगदान दिलं. पण महान फलंदाज सनथ जयसूर्या, कॅप्टन तिलकरत्ने दिलशान, उपुल थरंगा हे मात्र स्वस्तात माघारी परतले. भारताकडून विनय कुमारनं 3 तर अभिमन्यू मिथुननं दोन विकेट्स घेतल्या.
TON UP FOR NAMAN OJHA! A blitzering knock from the wicketkeeper as he gets it off just 68 balls! The @India__Legends with a wonderful fightback!#INDLvsSLL #RoadSafetyWorldSeries #RSWS #YehJungHaiLegendary pic.twitter.com/SgeBMr0BfF
— Road Safety World Series (@RSWorldSeries) October 1, 2022
सचिनचा गोल्डन डक फायनलमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मात्र खास कामगिरी करता आली नाही. नुआन कुलशेखराच्या पहिल्याच बॉलवर सचिन पहिल्याच बॉलवर बोल्ड झाला. त्यामुळे स्टेडियममध्ये जमलेल्या चाहत्यांची मात्र निराशा झाली.