मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Ind vs Eng: अ‍ॅडलेडमध्ये टीम इंडियाला मिळणार फायनलचं तिकीट? पण भारताला सतावतेय ही मोठी चिंता

Ind vs Eng: अ‍ॅडलेडमध्ये टीम इंडियाला मिळणार फायनलचं तिकीट? पण भारताला सतावतेय ही मोठी चिंता

रोहित शर्मा

रोहित शर्मा

Ind vs Eng: सेमी फायनलच्या लढतीआधी टीम इंडियाच्या एका खेळाडूचा फॉर्म हा चिंतेचं कारण ठरु शकतो. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

अ‍ॅडलेड, 09 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपपासून टीम इंडिया आता फक्त दोन पावलं दूर आहे. अ‍ॅडलेडच्या मैदानात भारत आणि इंग्लंड संघात दुसरा सेमी फायनलचा मुकाबला होणार आहे. रोहित शर्मा अँड कंपनी या निर्णायक लढतीसाठी सज्ज झाली आहे. भारतानं हा सामना जिंकल्यास रविवारी टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध महामुकाबला खेळणार आहे. पण सेमी फायनलच्या लढतीआधी टीम इंडियाच्या एका खेळाडूचा फॉर्म हा चिंतेचं कारण ठरु शकतो. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

रोहितचा आऊट ऑफ फॉर्म

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं आपल्या कुशल नेतृत्वानं सर्वांनाच प्रभावित केलं आहे. रोहित पहिल्यांदाच आयसीसीच्या स्पर्धेत टीम इंडियाचं नेतृत्व करतोय. पण यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये रोहितच्या बॅटमधून धावांचा ओघ मात्र आटला आहे. त्यानं गेल्या 5 मॅचमध्ये केवळ 89 धावा केल्या आहेत. त्यात फक्त नेदरलँडविरुद्ध रोहितनं सर्वाधिक 53 धावा केल्या आहेत. त्यामुळे गावस्कर यांच्या मते रोहितचा हाच फॉर्म ही टीम इंडियासाठी चिंतेची बाब ठरु शकते. पण त्याचबरोबर समाधानाची बाब ही की रोहितचा पार्टनर लोकेश राहुलचा फॉर्म परत आला आहे. सूर्यकुमार यादव धावांचा पाऊस पाडतोय. तर विराट कोहलीनं यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्यात टीम इंडियानं पाचपैकी 4 मॅच जिंकल्या आहेत. त्यामुळे रोहितचं अपयश झाकलं गेलं.

इंग्लंडविरुद्ध रोहितकडून अपेक्षा

सेमी फायनलच्या महत्वाच्या लढतीत आता रोहितकडून मोठ्या अपेक्षा आहेत. अॅडलेडच्या मैदानात रोहित कर्णधाराला साजेशी इनिंग करेल असा चाहत्यांना विश्वास आहे. दरम्यान सरावावेळी झालेल्या दुखापतीतून फिट झाल्याचं रोहितनं स्पष्ट केलंय.

हेही वाचा - T20 World Cup: टीम इंडियासाठी धोक्याची घंटा... पाकिस्तान वर्ल्ड कप जिंकण्याच्या वाटेवर? पाहा काय आहे प्रकरण?

वर्ल्ड कपमध्ये चौथ्यांदा सामना

टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि इंग्लंड आजवर तीन वेळा आमनेसामने आले आहेत. 2007, 2009 आणि 2012 सालच्या वर्ल्ड कपमध्ये उभय संघ एकमेकांसमोर आले होते. त्यात दोन वेळा भारतानं तर एकदा इंग्लंडनं बाजी मारली होती. त्यामुळे तब्बल 10 वर्षांनी भारत आणि इंग्लंड संघात टी20 वर्ल्ड कपचा सामना होणार आहे.

First published:

Tags: India vs england, Sports, T20 world cup 2022