जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL Auction मध्ये विक्रमी बोली लागूनही इशान किशन रोहितसोबत करणार नाही ओपनिंग? पाहा कारण

IPL Auction मध्ये विक्रमी बोली लागूनही इशान किशन रोहितसोबत करणार नाही ओपनिंग? पाहा कारण

IPL Auction मध्ये विक्रमी बोली लागूनही इशान किशन रोहितसोबत करणार नाही ओपनिंग? पाहा कारण

आयपीएल लिलावामध्ये (IPL Auction 2022) इशान किशनला (Ishan Kishan) मुंबई इंडियन्सनी (Mumbai Indians) तब्बल 15.25 कोटी रुपये देऊन विकत घेतलं. यानंतर आता इशान किशन बुधवारी पहिल्यांदाच मैदानात दिसणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

कोलकाता, 15 फेब्रुवारी : आयपीएल लिलावामध्ये (IPL Auction 2022) इशान किशनला (Ishan Kishan) मुंबई इंडियन्सनी (Mumbai Indians) तब्बल 15.25 कोटी रुपये देऊन विकत घेतलं. यानंतर आता इशान किशन बुधवारी पहिल्यांदाच मैदानात दिसणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies T20) यांच्यातल्या तीन टी-20 मॅचच्या सीरिजला कोलकात्यामधल्या इडन गार्डनमधून सुरूवात होणार आहे. वेस्ट इंडिजने भारताविरुद्धची वनडे सीरिज 3-0 ने गमावली असली, तरी त्यांच्याकडून टी-20 मध्ये आव्हान उभं केलं जाऊ शकतं. काहीच दिवसांपूर्वी वेस्ट इंडिजने टी-20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडला धूळ चारली आहे. या सीरिजसाठी टीम इंडिया कोलकात्याला पोहोचली असून ट्रेनिंगही सुरू झालं आहे. सीरिजआधीच टीम इंडियाला धक्का बसला, कारण ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) दुखापतीमुळे सीरिजमधून बाहेर झाला आहे. तर केएल राहुलही (KL Rahul) दुखापतीमुळे सीरिज खेळू शकणार नाही. राहुलच्या गैरहजेरीत इशान किशनला रोहितसोबत ओपनिंगची संधी मिळणार का? हा प्रश्न आहे. इशान किशनसोबतच टीमकडे ऋतुराज गायकवाडचाही (Ruturaj Gaikwad) ओपनर म्हणून पर्याय आहे. आयपीएलच्या मागच्या मोसमात ऋतुराजने चेन्नई सुपर किंग्सकडून (CSK) खेळताना धमाका केला होता. दोन महिन्यांपूर्वी विजय हजारे ट्रॉफीमध्ये ऋतुराजने 5 मॅचमध्ये 4 शतकं ठोकली होती, त्यामुळे ऋतुराजला खेळवलं जाऊ शकतं. इशान किशन बॅटिंगसोबतच विकेट कीपिंगही करतो, त्यामुळे ऋषभ पंतला (Rishabh Pant) विश्रांती दिली जाण्याचीही शक्यता आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजनंतर लगेचच भारत आणि श्रीलंका यांच्यात 2 टेस्ट आणि 3 टी-20 मॅचची सीरिज होणार आहे. तसंच ऋषभ पंत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने क्रिकेट खेळत आहे, म्हणून त्यालाही विश्रांती देण्याचा विचार केला जाऊ शकतो. व्यंकटेश अय्यरही पर्याय इशान किशन आणि ऋतुराज गायकवाडशिवाय टीम इंडियाकडे व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) हादेखील ओपनिंगचा पर्याय आहे. अय्यर बॅटिंगसह मध्यम गती बॉलिंगही करू शकतो. केकेआरकडून खेळताना व्यंकटेश अय्यरला यशही मिळालं होतं. मागच्याच वर्षी न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमधून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. आयपीएल 2021 च्या दुसऱ्या राऊंडमध्ये अय्यरने 40 च्या सरासरीने 320 रन केले, तसंच तो टीमसाठी सहावा बॉलर म्हणूनही उपयुक्त ठरू शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात