Home /News /sport /

IND vs WI : 19 वर्ष आणि 6 सीरिज, रोहित शर्माला इतिहास वाचवण्याचं आव्हान!

IND vs WI : 19 वर्ष आणि 6 सीरिज, रोहित शर्माला इतिहास वाचवण्याचं आव्हान!

भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातल्या वनडे सीरिजला 6 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. वनडे सीरिजच्या तिन्ही मॅच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहेत. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात खेळणारी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत झालेला पराभव विसरून नव्याने सुरूवात करण्यासाठी तयार आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 29 जानेवारी : भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातल्या वनडे सीरिजला 6 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. वनडे सीरिजच्या तिन्ही मॅच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहेत. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात खेळणारी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत झालेला पराभव विसरून नव्याने सुरूवात करण्यासाठी तयार आहे. टीम इंडियाचं घरच्या मैदानात वेस्ट इंडिजविरुद्ध रेकॉर्ड धमाकेदार आहे. भारताने मागच्या 19 वर्षांमध्ये घरच्या मैदानात वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे सीरिज गमावलेली नाही. टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानात मागच्या 6 वनडे सीरिज जिंकल्या आहेत. मागच्यावेळी वेस्ट इंडिजने भारताचा भारतामध्येच नोव्हेंबर 2002 साली पराभव केला होता. कार्ल हुपरच्या नेतृत्वात खेळलेल्या वेस्ट इंडिजने 7 वनडे मॅचच्या सीरिजमध्ये भारताला 4-3 ने हरवलं होतं. त्या सीरिजमध्ये 455 रन करणाऱ्या क्रिस गेलला (Chris Gayle) प्लेयर ऑफ द सीरिज देऊन गौरवण्यात आलं होतं. यानंतर वेस्ट इंडिजचा भारतात 2006-07 साली 3-1 ने, 2011 मध्ये 4-1 ने, 2013 साली 2-1 ने, 2015 साली 2-1 ने पराभव झाला होता. वेस्ट इंडिजची टीम मागच्या वेळी 2019 साली भारत दौऱ्यावर आली होती, तेव्हाही त्यांना 2-1 ने पराभूत व्हावं लागलं होतं. वेस्ट इंडिजने पहिल्यांदा भारताचा दौरा 1983-84 साली केला होता. पाच मॅचच्या या सीरिजमध्ये वेस्ट इंडिजने भारताचा 5-0 ने पराभव केला होता. या सीरिजच्या काही दिवस आधीच भारताने लॉर्ड्सवर इतिहास घडवत वेस्ट इंडिजला हरवून पहिल्यांदाच वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. वनडे सीरिजचं वेळापत्रक पहिली वनडे- 6 फेब्रुवारी, अहमदाबाद दुसरी वनडे- 9 फेब्रुवारी, अहमदाबाद तिसरी वनडे- 12 फेब्रुवारी, अहमदाबाद भारताची वनडे टीम रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान वनडे सीरिजसाठी वेस्ट इंडिजची टीम कायरन पोलार्ड (कर्णधार), केमार रोच, एनक्रुमा बोनर, ब्रेण्डन किंग, फॅबियन एलन, डॅरेन ब्रावो, शमराह ब्रूक्स, जेसन होल्डर, शाय होप, अकील हुसैन, अल्झारी जोसेफ, निकोलस पूरन, रोमारियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, हेडन वॉल्श ज्युनियर
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Rohit sharma, Team india, West indies

    पुढील बातम्या