मुंबई, 4 फेब्रुवारी: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या (India vs West Indies) 3 वनडे मॅचच्या सीरिजला 6 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. वनडे सीरिजनंतर 3 टी-20 मॅचची सीरिज होणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन वनडे 6, 9 आणि 11 फेब्रुवारीला खेळवल्या जातील, तर टी-20 मॅच 16, 18 आणि 20 फेब्रुवारीला आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धची सीरिज सुरू होण्याआधीच टीम इंडियाला मोठे धक्के बसत आहेत. टीम इंडियाच्या बायो-बबलमध्ये कोरोनाने (Corona Virus) शिरकाव केला आहे, त्यामुळे शिखर धवन (Shikhar Dhawan), ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांच्यासह टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफना कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोनामुळे धवन आणि ऋतुराज हे टीम इंडियाचे दोन ओपनर आधीच बाहेर झालेले असताना केएल राहुलही (KL Rahul) पहिली वनडे खेळणार नाही. विश्रांती म्हणून राहुल पहिली वनडे खेळणार नसेल, असं सुरुवातीला बोललं जात होतं. पण राहुल लग्नामुळे पहिली वनडे खेळणार नाही, असं कारण आता समोर आलं आहे. राहुलच्या बहिणीचं लग्न असल्यामुळे तो पहिल्या वनडेसाठी उपलब्ध नसेल.
धवन, ऋतुराज आणि श्रेयस अय्यरची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे राहुलला पुन्हा टीममध्ये बोलावलं जाईल, असं सांगण्यात येत होतं. पण बहिणीच्या लग्नामुळे राहुल व्यस्त आहे, म्हणून आता तो दुसऱ्या वनडेपासून उपलब्ध असेल.
केएल राहुल पहिली वनडे खेळणार नसल्यामुळे मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) किंवा इशान किशन (Ishan Kishan) यांच्यापैकी एक जण ओपनिंगला खेळू शकतो. टीम इंडियात कोरोनाने शिरकाव केल्यामुळे आता फक्त पाच बॅटर उरले आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत यांच्याशिवाय ऑलराऊंडर दीपक हुड्डा प्लेयिंग इलेव्हनमध्ये दिसू शकतात. मयंक अग्रवाल 2 फेब्रुवारीला टीममध्ये आला आहे.
भारत-वेस्ट इंडिज सीरिजचं वेळापत्रक
6 फेब्रुवारी- पहिली वनडे, अहमदाबाद
9 फेब्रुवारी- दुसरी वनडे, अहमदाबाद
11 फेब्रुवारी- तिसरी वनडे, अहमदाबाद
16 फेब्रुवारी- पहिली टी-20, कोलकाता
18 फेब्रुवारी- दुसरी टी-20, कोलकाता
20 फेब्रुवारी- तिसरी टी-20, कोलकाता
भारताची वनडे टीम
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, रवी बिष्णोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान
भारताची टी-20 टीम
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिष्णोई, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Ishan kishan, Kl rahul, Shikhar dhavan, Shreyas iyer, Sports, Team india, Virat kohli, West indies, Yuzvendra Chahal