कोलकाता, 20 फेब्रुवारी : वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियाने (India vs West Indies 3rd T20) 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावत 184 रन केले आहेत. या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डने (Kieron Pollard) टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर बॅटिंगला आलेल्या टीम इंडियाची सुरूवात खराब झाली. ओपनर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) 8 बॉलमध्ये 4 रन करून आऊट झाला. यानंतर इशान किशन (Ishan Kishan) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी भारताच्या इनिंगला आकार दिला, पण श्रेयस 16 बॉलमध्ये 25 रन करून तर इशान किशन 31 बॉलमध्ये 34 रन करून माघारी परतला. ऋतुराज गायकवाडसाठी मधल्या फळीत बॅटिंगला आलेला कर्णधार रोहित शर्माही (Rohit Sharma) 15 बॉलमध्ये 7 रन करून आऊट झाला. भारताची अवस्था 13.5 ओव्हरमध्ये 93/4 अशी झाली होती, पण सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) यांनी वेस्ट इंडिजच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. सूर्यकुमार यादवने 31 बॉलमध्ये 209.68 च्या स्ट्राईक रेटने 65 रन केले, यामध्ये 7 सिक्स आणि एका फोरचा समावेश होता. इनिंगच्या शेवटच्या बॉलला सूर्या आऊट झाला. व्यंकटेश अय्यर 19 बॉलमध्ये 35 रनवर नाबाद राहिला. व्यंकटेशने 4 फोर आणि 2 सिक्स लगावले. युवराजच्या त्या खेळीचा विक्रम मोडला सूर्यकुमार यादव आणि व्यंकटेश अय्यर या जोडीने शेवटच्या 5 ओव्हरमध्ये तब्बल 86 रन केले. याचसह टीम इंडियाने डरबनमध्ये 2007 वर्ल्ड कपला (T20 World Cup) इंग्लंडविरुद्ध केलेला विक्रमही मोडला आहे. डरबनमध्ये झालेल्या सामन्यात भारताने शेवटच्या 5 ओव्हरमध्ये 80 रन केले होते. त्या मॅचमध्ये युवराज सिंगने (Yuvraj Singh) स्टुअर्ट ब्रॉडला 6 बॉलमध्ये 6 सिक्स लगावल्या होत्या. 2019 साली भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध बँगलोरला अखेरच्या 5 ओव्हरमध्ये 77 रन, 2010 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 75 रन आणि 2012 साली पाकिस्तानविरुद्ध 74 रन केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.