मुंबई, 02 जानेवारी : नव्या वर्षात टीम इंडिया 3 जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल यांसारख्या सिनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंचा संघ श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरणार आहे. भारत श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना 3 जानेवारी रोजी वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. श्रीलंकेने टी20 मध्ये आशियाई चॅम्पियनशिप जिंकली होती. श्रीलंका आणि भारत दोघेही 2024 मध्ये वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपच्या तयारीसाठी संघाची ताकद अजमावण्याचा प्रयत्न करतील. हेही वाचा : पंतच नव्हे तर टीम इंडियाचे 8 खेळाडू दुखापतीने त्रस्त, संघ निवडीत DEXAचे आव्हान मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी20 सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी सातच्या सुमारास सामना सुरू होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरून होणार आहे. स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी एचडी, स्टार स्पोर्ट्स फर्स्ट, स्टार स्पोर्ट्स 1 तमिल, स्टार स्पोर्ट्स 1 तेलुगु, स्टार स्पोर्ट्स 1 कन्नड़ या चॅनेल्सवर सामना पाहता येईल. भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी20 मालिकेचं लाइव्ह स्ट्रिमींग डिझने हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवरही पाहता येईल. तसंच डीडी स्पोर्ट्सवरूनही सामन्याचे प्रक्षेपण होणार आहे. हेही वाचा : Rishabh Pant : पंतवरचं संकट टळलं; ICUमधून बाहेर, पण आता विश्रांती मिळेना भारतीय संघ : हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋतुराज गायकवाड़, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, शिवम मावी, ईशान किशन, संजू सैमसन, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, उमरान मलिक, मुकेश कुमार.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.