मुंबई, 3 जानेवारी : टीम इंडियाची नव्या वर्षातील पहिलीच आंतरराष्ट्रीय मॅच आज (3 जानेवारी) श्रीलंकेविरुद्ध होत आहे. श्रीलंकन टीम आशिया कप स्पर्धेची चॅम्पियन आहे. युएईत झालेल्या स्पर्धेनंतर दोन्ही टीम पहिल्यांदाच आमने-सामने येत आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर होणाऱ्या या मॅचबद्दल मुंबईकरांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. ही मॅच सुरू होण्यापूर्वीच फॅन्सनी मॅचचा आणि या सीरिजचा निकाल सांगितला आहे. हार्दिकवर विश्वास श्रीलंका विरुद्धच्या सीरिजसाठी रोहित शर्मा, विराट कोहली या सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये हार्दिक पांड्या भारतीय टीमचा कॅप्टन आहे. हार्दिकसाठी वानखेडे स्टेडिअम नवं नाही. तो इथं मुंबई इंडियन्सकडून अनेक सामने खेळला आहे. त्याचबरोबर मागील आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा कॅप्टन म्हणूनही तो इथं खेळलाय. बुमराह इज बॅक! टीम इंडियासाठी गूड न्यूज, श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी संघ जाहीर ‘कुणालाही कल्पना नसताना कमकुवत वाटणाऱ्या गुजरातच्या टीमला घेऊन हार्दिकनं आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं होतं. तो श्रीलंकेविरुद्धही कमाल करेल. हा सामनाच नाही तर संपूर्ण मालिका 3-0 नं जिंकली तर आश्चर्य वाटणार नाही, असं मत मुंबईकर फॅन्सनी व्यक्त केलंय. हार्दिकच्या टीममध्ये अनेक तरुण खेळाडू आहेत. ते या सीरिजमध्ये छाप पाडण्यासाठी उत्सुक असतील, असंही त्यांनी सांगितलं. IND vs SL : पहिला टी20 सामना आज, कुठे पाहायचा? कशी आहे खेळपट्टी? श्रीलंकेच्या कोणत्या खेळाडूचा धोका? श्रीलंकेच्या टीमला कमकुवत लेखू नये असा इशाराही काही मुंबईकरांनी दिलाय. श्रीलंकेकडं हसरंगा हा अनुभवी स्पिनर आहे. त्याच्या बॉलिंगपासून भारतीय खेळाडूंनी विशेषत: संजू सॅमसननं सावध राहावं. हसरंगा लोअर ऑर्डरमधील उपयुक्त बॅटर आहे. तो या सीरिजमध्ये भारतीय टीमसाठी डोकेदुखी ठरू शकतो, असं मुंबईच्या फॅन्सना वाटतं. श्रीलंकेचा कॅप्टन दासून शनाकापासूनही टीम इंडियानं सावध राहावं असा इशाराही फॅन्सनी दिलाय. वानखेडे स्टेडिअमवर नेहमीच भरपूर रन निघतात. या सामन्यातही भरपूर रन्स निघतील. सिक्स आणि फोरची बरसात होईल. 180 चं टार्गेट आरामात चेस होईल, असं भाकित फॅन्सनी केलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.