मुंबई, 03 जानेवारी : भारतीय संघासाठी सर्वात चांगली बातमी समोर आली असून बीसीसीआय़ने श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला संधी देण्यात आली आहे. दुखापतीमुळे संघाबाहेर असणारा बुमराह तंदुरुस्त झाला असून श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय संघात त्याचा समावेश करण्यात आलाय. पुढच्या आठवड्यात होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत तो खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या चार सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीआधी भारतासाठी ही सर्वात मोठी बातमी आहे. बुमराह बऱ्याच काळापासून दुखापतीने त्रस्त होता. आता तो पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. बीसीसीआयने दिलेल्या निवेदनात म्हटलं की, निवड समितीने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला श्रीलंकेविरिुद्धच्या ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत निवडलं आहे. हेही वाचा : IND vs SL : पहिला टी20 सामना आज, कुठे पाहायचा? कशी आहे खेळपट्टी? भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), वाशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंह.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.