मुंबई, 03 जानेवारी : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिला टी20 सामना आज सायंकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. भारतीय क्रिकेट संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेविरुद्ध टी२० सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. यात विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, दिनेश कार्तिक हेसुद्धा टी20 संघाचा भाग बनण्याची शक्यता नाही. बीसीसीआयकडून आता २०२४ मध्ये होणाऱ्या पुढच्या टी२० वर्ल्ड कपच्या तयारीला सुरुवात करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिकेत १-० ने विजय मिळवला होता. पहिल्या टी२० सामन्यात इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांना सलामीला संधी दिली जाऊ शकते. तर सूर्यकुमार यादव हा हार्दिक पांड्यासोबत मधल्या फळीत खेळू शकतो. याशिवाय संजू सॅमसन आणि राहुल त्रिपाठी यांच्यातील मधल्या फळीत कोण फिट बसेल हेसुद्धा पाहावं लागेल. हेही वाचा : बॉल्स 9, रन्स 5 आणि विकेट्स तब्बल 7 दिल्लीचे हाल बेहाल; ज्याला टीमनं 12 वर्षं बसवलं बाहेर त्यानंच घेतली हॅट्रिक यष्टीरक्षक ऋषभ पंतचा अपघात झाल्यानं आता संजू सॅमसन की इशान किशन असे दोन पर्याय यष्टीरक्षणासाठी भारतासमोर आहेत. तर गोलंदाजीत युझवेंद्र चहल आणि अक्षर पटेल ही फिरकीपटूंची जोडी दिसू शकते. याशिवाय अर्शदीप सिंह आणि हर्षल पटेल यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. फलंदाजीला पोषक खेळपट्टी वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी ही लाल मातीची आहे आणि इथे चेंडूला उसळी मिळते. शिवाय समुद्री वाऱ्यामुळे चेंडू स्विंगही होण्याची शक्यता आहे. वानखेडे स्टेडियमची सीमारेषा लहान असून जास्त धावा होऊ शकतात. या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकणारा संघ दुसऱ्यांदा फलंदाजी करण्याला प्राधान्य देईल. इशान किशन आणि कुशल मेंडिस यांच्यासारखे फटकेबाजी करणारे खेळाडू चौकार, षटकारांची बरसात करू शकतील. हेही वाचा : बॅट मेकरची तुफान फटकेबाजी, स्वत:च बॅट बनवतो अन् इतरांच्या रिपेअर करून देतो लाइव्ह कुठे पाहायचे? सामना सायंकाळी सात वाजता सुरू होणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाची कोणतीच शक्यता नाही. सायंकाळी आर्द्रतेची पातळी ६० टक्क्यांहून जास्त असेल. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टी२० मालिकेचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे. लाइव्ह स्ट्रिमिंग डिजनी हॉटस्टार अॅपवर आणि वेबसाइटवर पाहता येणार आहे. तर लाइव्ह टेलिकास्ट फ्रीमध्ये डीडी स्पोर्ट्सवर दिसणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.