मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs NZ ODI: तिसऱ्या वन डेतही पाऊसच जिंकला... किवींनी जिंकली मालिका, टीम इंडियाचं पाहा काय चुकलं?

Ind vs NZ ODI: तिसऱ्या वन डेतही पाऊसच जिंकला... किवींनी जिंकली मालिका, टीम इंडियाचं पाहा काय चुकलं?

तिसऱ्या वन डेतही पावसाचा खेळ

तिसऱ्या वन डेतही पावसाचा खेळ

Ind vs NZ ODI: आज ख्राईस्टचर्चमधअये पावसामुळे सामना अर्ध्यावरच थांबवावा लागला. त्यानंतर परिस्थिती पाहता अम्पायर्सनी हा सामा रद्द केला. त्यामुळे न्यूझीलंडनं ही मालिका 1-0 अशी जिंकली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

ख्राईस्टचर्च, 30 नोव्हेंबर: भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यात यंदा पावसानं चांगलाच गोंधळ घातला. टी20 मालिकेतील दोन सामने पावसामुळे पूर्ण होऊ शकले नाहीत. तर वन डेतही तेच घडलं. उभय संघातली पहिली वन डे न्यूझीलंडनं सात विकेट्सनं जिंकली होती. त्यामुळे वन डे मालिका विजयाच्या दृष्टीनं ही बाब न्यूझीलंडच्या फायद्याची ठरली. आज ख्राईस्टचर्चमधअये पावसामुळे सामना अर्ध्यावरच थांबवावा लागला. त्यानंतर परिस्थिती पाहता अम्पायर्सनी हा सामा रद्द केला. त्यामुळे न्यूझीलंडनं ही मालिका 1-0 अशी जिंकली.

ख्राईस्टचर्चमध्ये भारताची हाराकिरी

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वन डेत भारतीय फलंदाजांनी हाराकिरी केली. वॉशिंग्टन सुंदरचा अपवाद वगळता एकाही बॅट्समनला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे टीम इंडियाचा डाव 47.3 ओव्हर्समध्ये 219 धावात आटोपला. वॉशिंग्टन सुंदरनं 51 धावांची खेळी करुन टीम इंडियाला दोनशे धावांचा टप्पा गाठून दिला. त्याचं वन डे क्रिकेटमधलं हे पहिलंच अर्धशतक ठरलं. पण इतर भारतीय फलंदाजांनी ख्राईस्टचर्चच्या निर्णायक वन डेत निराशा केली.

पहिल्या दोन्ही सामन्यात दमदार कामगिरी केलेल्या शुबमन गिलनं फक्त 13 धावा केल्या. तर कॅप्टन शिखर धवनही 28 धावा करुन बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यरनं टीम इंडियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण 49 धावांवर असताना खराब फटका खेळून तो बाद झाला. भारताचा निम्मा संघ 121 धावातच तंबूत परतला होता. पण त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरनं एका बाजून भारताला समाधानकारक धावसंख्या उभारुन दिली. न्यूझीलंडकडून अॅडम मिल्ने आणि डॅरिल मिचेलनं प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर साऊदीनं 2 फलंदाजांना माघारी धाडलं.

किवींची दमदार सुरुवात

220 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंड संघानं दमदार सुरुवात केली. त्यांनी 18 ओव्हर्समध्येच 104 धावा स्कोअरबोर्डवर लावल्या होत्या. त्यामुळे न्यूझीलंड ही मॅच आरामात जिंकणार असं वाटत असतानाच पावसाचा व्यत्यय आला. डकवर्थ लुईसचा अवलंब करण्यासाठी 20 ओव्हर्स पूर्ण होणं गरजेचं होतं. पण पाऊस न थांबल्यानं पुढे खेळ होऊ शकला नाही. न्यूझीलंडकडून फिन अॅलननं 57 धावा केल्या. तर कॉनवे 38 धावांवर नाबाद राहिला.

हेही वाचा - Ind A tour of Ban: मुंबईच्या 'या' बॅट्समनची लवकरच टीम इंडियात एन्ट्री? बांगलादेशविरुद्ध पदार्पणातच ठोकलं शतक

टीम इंडियाला तो पराभव महागात

हॅमिल्टनच्या पहिल्या वन डेत टीम इंडियानं 306 धावा करुनही त्या मॅचमध्ये शिखर धवन अँड कंपनीला पराभव स्वीकारावा लागला. भारतीय गोलंदाजांनी त्या मॅचमध्ये केलेल्या चुका टीम इंडियाला चांगल्याच महागात पडल्या. ती मॅच जिंकली असची तर टी20 सह वन डे मालिकाही भारताला जिंकता आली असती.

First published:

Tags: Cricket, Sports