जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / रोहित शर्माने भर मैदानात शार्दूल ठाकूरला केली शिवीगाळ

रोहित शर्माने भर मैदानात शार्दूल ठाकूरला केली शिवीगाळ

रोहित शर्माने भर मैदानात शार्दूल ठाकूरला केली शिवीगाळ

भारत आणि न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात शार्दुल ठाकूरने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन केले. त्याने तिसऱ्या सामन्यात फलंदाजी करताना 25 धावा केल्या तर भेदक गोलंदाजी करत त्याने न्यूझीलंडच्या 3 खेळाडूंना माघारी धाडले.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 25 जानेवारी : मंगळवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात वनडे मालिकेतील तिसरा सामना पारपडला. या सामन्यात भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी करून न्यूझीलंडला 90 धावांनी पराभूत केले. या सोबतच भारताने या मालिकेत 3-0 ने आघाडी घेऊन मालिका जिंकली. या सामन्यात  3 विकेट्स घेणाऱ्या शार्दूल ठाकूर याला प्लेअर ऑफ द मॅचने गौरवण्यात आले तर शुभमन गिल याला प्लेअर ऑफ द सीरिजने सन्मानित करण्यात आले. भारत आणि न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात शार्दुल ठाकूरने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन केले.  त्याने तिसऱ्या सामन्यात फलंदाजी करताना 25 धावा केल्या तर भेदक गोलंदाजी करत त्याने न्यूझीलंडच्या 3 खेळाडूंना माघारी धाडले. परंतु असे असूनही रोहित शर्मा शार्दुलच्या एका चुकीमुळे  त्याच्यावर भडकला. रोहितने भर मैदानात त्याला शिवीगाळ केली. याविषयीचे फोटोस आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे ही पहा  : शुभमन गिलने केली कमाल! बाबर आझमच्या या विक्रमाशी केली बरोबरी तिसऱ्या सामन्यादरम्यान न्यूझीलंडची 25 षटकांनंतर धावसंख्या 2 बाद 184 अशी होती. डेव्हॉन कॉनवेसोबत डॅरेल मिशेल क्रीजवर होता. शार्दुलने 26 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मिशेलला बाद केले. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर कर्णधार टॉम लॅथमलाही माघारी धाडले. शार्दुलने ओव्हरचे शेवटचे दोन चेंडू टाकले. डेव्हॉन कॉनवेने शॉट बॉलवर सलग दोन चौकार मारले. याचा रोहित शर्माला राग आला. परंतु ओव्हरच्या शेवटचा चेंडू टाकत असताना रोहित शर्मा शार्दूलकडे गेला. त्याने शार्दुलला रागाने शिवीगाळ केली. तो शार्दुलला फलंदाजांना शॉर्ट बॉल टाकू नका असे सांगत होता.

News18लोकमत
News18लोकमत

रोहित सोबत झालेल्या या प्रकारानंतर शार्दुल ठाकूरने त्याच्या पुढच्या ओव्हरमध्येही एक विकेट घेतली. यावेळी शार्दुलने विकेटच्या लाइनवर गोलंदाजी केली. ग्लेन फिलिप्सने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला पण विराट कोहलीने त्याचा हा झेल  सहज पकडला.

News18लोकमत
News18लोकमत

भारताने न्यूझीलंडला विजयासाठी तिसऱ्या सामन्यात 385 धावा करून 386 धावांचे आव्हान दिले होते. परंतु 41 वी ओव्हर सुरु होईपर्यंत भारताने न्यूझीलंडच्या सर्व खेळाडूंची विकेट घेतली आणि न्यूझीलंड संघाला 90 धावांनी पराभूत केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात