मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs NZ : इतिहासाची पुनरावृत्ती, विराटच्या कमबॅकमुळे दुसरा 'कॅप्टन' टीमबाहेर जाणार!

IND vs NZ : इतिहासाची पुनरावृत्ती, विराटच्या कमबॅकमुळे दुसरा 'कॅप्टन' टीमबाहेर जाणार!

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टला (India vs New Zealand 2nd Test) 3 डिसेंबरपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. या सामन्यातून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) कमबॅक करत आहे.

मुंबई, 2 डिसेंबर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टला (India vs New Zealand 2nd Test) 3 डिसेंबरपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. या सामन्यातून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) कमबॅक करत आहे. टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) विराट कोहलीला (Virat Kohli) विश्रांती देण्यात आली होती, त्यामुळे तो न्यूझीलंडविरुद्धची तीन टी-20 मॅचची सीरिज आणि कानपूरमध्ये झालेली पहिली टेस्ट खेळला नव्हता. विराटच्याऐवजी पहिल्या टेस्टमध्ये अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) टीम इंडियाचं नेतृत्व केलं होतं, तर श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) भारताच्या टेस्ट टीममध्ये पदार्पण केलं. या सामन्यात श्रेयस अय्यरने पहिल्या इनिंगमध्ये शतक आणि दुसऱ्या इनिंगमध्ये अर्धशतक केलं. असा विक्रम करणारा तो भारताचा पहिलाच खेळाडू ठरला.

आता विराट कोहलीच्या कमबॅकनंतर प्लेयिंग-11 मधून कोण बाहेर जाणार याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. श्रेयस अय्यरने दाखवलेल्या फॉर्ममुळे त्याला टीमबाहेर करणं कठीण होऊन बसलं आहे. मागच्या 12 महिन्यांमध्ये चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे यांचा फॉर्म खराब राहिला आहे. अजिंक्य रहाणेच्या तर टीम निवडीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे आता मुंबई टेस्टमध्ये जर रहाणेचा पत्ता कट झाला तर लागोपाठ दुसऱ्यांदा विराटमुळे आधीच्या सामन्यात कॅप्टन असलेला खेळाडू टीमबाहेर जाईल.

धवननंतर रहाणेचा नंबर?

याआधी टीम इंडियाचे महत्त्वाचे खेळाडू इंग्लंड (India tour of England) दौऱ्यावर गेले असताना, भारताची युवा टीम श्रीलंकेच्या दौऱ्यावर (India vs Sri Lanka) गेली होती. या दौऱ्यात टीम इंडियाने वनडे आणि टी-20 मॅचची सीरिज खेळली होती. या दौऱ्यात शिखर धवन (Shikhar Dhawan) टीम इंडियाचा कर्णधार होता, पण यानंतर लगेचच झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये धवनला टीम इंडियात संधी देण्यात आली नाही. विराटच्या अनुपस्थितीमध्ये कानपूर टेस्टमध्ये अजिंक्य रहाणेने टीमचं नेतृत्व केलं, आता मुंबई टेस्टमध्ये रहाणे टीमबाहेर गेला तर लागोपाठ दुसऱ्यांदा कर्णधारालाच टीमबाहेर जावं लागण्याची नामुष्की ओढवेल.

First published:

Tags: Ajinkya rahane, New zealand, Team india, Virat kohli