मुंबई, 13 डिसेंबर : कतार फिफा वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमीफायनलला अवघे काही तास उरले आहेत. आतापर्यंत अनेक बलाढ्य संघांना स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे. अर्जेंटिना, क्रोएशिया, फ्रान्स आणि मोराक्को यांच्यात सेमीफायनल रंगणार आहे. गतविजेता फ्रान्स आणि मेस्सीच्या अर्जेंटिनाकडे लक्ष लागून राहिले आहे. अर्जेंटिना आणि क्रोएशिया यांच्यात सेमीफायनलमधील पहिली लढत होणार आहे. लुसेल स्टेडियमवर होणारा हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार 14 डिसेंबरला रात्री साडे बारा वाजता होणार आहे. फिफामधील दुसरी सेमीफायनलम मोराक्को आणि फ्रान्स यांच्यात होणार आहे. अल बायेत स्टेडियमवर होणारा हा सामना 15 डिसेंबर रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडे बारा वाजता सुरू होईल. हेही वाचा : FIFA WC 2022 : मेस्सीसोबत वादानंतर रेफ्रीवर कारवाई, फिफाने थेट पाठवलं घरी
फिफा वर्ल्ड कपमधील सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण टीव्हीवर स्पोर्ट्स 18 चॅनेलवर पाहता येणार आहे. याशिवाय सामन्यांचे लाइव्ह स्ट्रिमिंगसुद्धा होणार आहे. जिओच्या ग्राहकांना जिओ सिनेमावर (Jio Cinema) सामने पाहता येतील. जिओचे ग्राहक असतील तर त्यांना यासाठी वेगळ्या सब्सक्रिप्शनची गरज नाही.
हेही वाचा : व्हाईस कॅप्टन चेतेश्वर पुजारासह ‘हे’ 2 खेळाडू करणार मोठा रेकॉर्ड!
पहिली सेमीफायनल - अर्जेंटिना विरुद्ध क्रोएशिया अर्जेंटिनाने अखेरचा वर्ल्ड कप मॅराडोनाच्या नेतृत्वाखाली 1986 मध्ये जिंकला होता. त्यावेळी मेस्सीचा जन्मही झाला नव्हता. मेस्सीने 10 स्पॅनिश लीग, चार चॅम्पियन लीग, 2021 कोपा अमेरिका विजेतेपद पटकावलं आहे. याशिवाय सात वेळा बेलोन डी ओर पुरस्कारही पटकावला आहे. पाच वेळा वर्ल्ड कपमध्ये खेळलेल्या मेस्सीला फिफाचं विजेतेपद मात्र जिंकता आलेलं नाही. दुसरीकडे क्रोएशियाचा संघ तिसऱ्यांदा सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. आतापर्यंतची त्यांची कामगिरी जबरदस्त आहे. लुका मॉड्रीचच्या नेतृत्वाखाली क्रोएशियाची मीडफिल्ड जबरदस्त असून गेल्या वर्ल्ड कपमध्ये त्यांना फ्रान्सकडून पराभूत व्हावं लागलं होतं.

)







