मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /दुखापतीचं ग्रहण सुटेना! ऑस्ट्रेलिया मालिकेतून टीम इंडियाचा स्टार खेळाडू बाहेर

दुखापतीचं ग्रहण सुटेना! ऑस्ट्रेलिया मालिकेतून टीम इंडियाचा स्टार खेळाडू बाहेर

9 फेब्रुवारी पासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. 9 फेब्रुवारी ते 13 मार्च पर्यंत ही कसोटी मालिका खेळवली जाणार असून यात कोणता संघ विजयी होईल हे पाहाण महत्वाचं असणार आहे.

9 फेब्रुवारी पासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. 9 फेब्रुवारी ते 13 मार्च पर्यंत ही कसोटी मालिका खेळवली जाणार असून यात कोणता संघ विजयी होईल हे पाहाण महत्वाचं असणार आहे.

9 फेब्रुवारी पासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. 9 फेब्रुवारी ते 13 मार्च पर्यंत ही कसोटी मालिका खेळवली जाणार असून यात कोणता संघ विजयी होईल हे पाहाण महत्वाचं असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 1 फेब्रुवारी : 9 फेब्रुवारी पासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. परंतु अजूनही भारतीय संघाला लागलेले दुखापतीने ग्रहण सुटण्याच नाव घेत नाही. आधी जसप्रीत बुमराह नंतर रिषभ पंत आणि आता भारताचा अजून एक स्टार खेळाडू दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यांना मुकणार असल्याची माहिती समोर आली आहे.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार भारताचा स्टार क्रिकेटर श्रेयस अय्यर त्याच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर राहणार आहे. श्रेयस अय्यर यापूर्वी पाठीच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेतून बाहेर पडला होता.

हे ही वाचा  : 'मी कधीच त्यांना...', विराट कोहलीने लता दीदींविषयी व्यक्त केली खंत

श्रेयस अय्यर भारतासाठी कसोटी क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेयसची दुखापत अपेक्षेप्रमाणे बरी झालेली नाही आणि त्याला पुन्हा क्रिकेट खेळण्यासाठी किमान दोन आठवडे लागतील. तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या कसोटीसाठी नक्कीच उपलब्ध नसेल. तसेच दुसऱ्या कसोटीसाठी त्याची उपलब्धता त्याच्या फिटनेस अहवालाच्या अवलंबून असणार आहे. परंतु श्रेयस अय्यरबाबत अजूनही बीसीसीआयने अधिकृत माहिती दिलेली नाही.

श्रेयस अय्यरने 2022 वर्षात उत्तम कामगिरी केली आहे. श्रेयस अय्यरने गेल्या वर्षी 17 वनडेत 724 धावा केल्या असून तो भारतीय वनडे  क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. तसेच श्रेयस अय्यरने भारतीय संघासाठी आतापर्यंत 7 कसोटी, 42 वनडे  आणि 49 टी 20 सामने खेळले आहेत. आता श्रेयस अय्यर ऐवजी भारताच्या कसोटी संघात कोणाला संधी मिळणार हे पाहाणं महत्वाचं ठरेल.

हे ही वाचा  : IND VS NZ : पृथ्वी शॉ करणार शुभमन गिलला रिप्लेस? तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियात होणार मोठे बदल

9 फेब्रुवारी पासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. 9 फेब्रुवारी ते 13 मार्च पर्यंत ही कसोटी मालिका खेळवली जाणार असून यात कोणता संघ विजयी होत हे पाहाण महत्वाचं असणार आहे. यातील पाहिला सामना 9 ते 13 फेब्रुवारी पर्यंत विदर्भ क्रिकेट स्टेडीयमवर खेळवण्यात येईल.

First published:

Tags: Cricket, Cricket news, India vs Australia, Jasprit bumrah, Rishabh pant, Shreyas iyer, Team india