मुंबई, 1 फेब्रुवारी : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना आज पारपडणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार असून यात टीम इंडिया मालिका विजयासाठी आपले सर्वस्वपणाला लावताना दिसेल. भारत आणि न्यूझीलंडने यापूर्वी टी 20 मालिकेतील प्रत्येकी एक सामने जिंकून मालिकेत बरोबरी साधली आहे. मालिका विजय मिळवण्यासाठी आजचा सामना भारतीय संघा करता करो या मरो चा असल्याने तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. न्यूझीलंड विरुद्ध टी 20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला 21 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारताने निसटता विजय मिळवला. तेव्हा आता अंतिम सामना जिंकलायचा झाल्यास भारतीय संघाला चांगल्या खेळाचे प्रदर्शन करणे गरजेचे आहे. हे ही वाचा : IND VS NZ: करो या मरो! आज न्यूझीलंड विरुद्ध टी 20 मालिकेतील निर्णायक सामना, कधी कुठे पाहाल? युवा क्रिकेटर पृथ्वी शॉचा बऱ्याच कालावधीनंतर न्यूझीलंड विरुद्ध टी 20 मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. परंतु पहिल्या दोन्ही सामन्यात पृथ्वीला प्लेयिंग 11 मध्ये संधी मिळाली नाही. काही दिवसांपूर्वी रणजी सामन्यात त्रिशतकीय खेळी करून पृथ्वीने आपली प्रतिभा सिद्ध केली होती.
तेव्हा आजच्या निर्णायक सामन्यात पृथ्वी शॉला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच पृथ्वी शॉ हा शुभमन गिलला रिप्लेस करून सलामी फलंदाज म्हणून मैदानात उतरेल अशी देखील माहिती मिळत आहे. तर न्यूझीलंड विरुद्धचा तिसरा सामना अत्यंत महत्वाचा असल्याने गोलंदाजांपैकी युझवेंद्र चहल ऐवजी उमरान मलिक याला संधी दिली जाऊ शकते. अशी असेल भारताची प्लेयिंग 11 : पृथ्वी शॉ/ शुभमन गिल, इशान किशन, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, कुलदीप यादव, उमरान मलिक, अर्शदीप सिंग