मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

केएल राहुलच्या कामगिरीमुळे दोघांचे संघातील स्थान अडचणीत?

केएल राहुलच्या कामगिरीमुळे दोघांचे संघातील स्थान अडचणीत?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात केएल राहुलने पाचव्या क्रमांकावर खेळताना 80 धावा केल्या. त्याशिवाय त्याने यष्टीरक्षणातही अफलातून कामगिरी केली.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात केएल राहुलने पाचव्या क्रमांकावर खेळताना 80 धावा केल्या. त्याशिवाय त्याने यष्टीरक्षणातही अफलातून कामगिरी केली.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात केएल राहुलने पाचव्या क्रमांकावर खेळताना 80 धावा केल्या. त्याशिवाय त्याने यष्टीरक्षणातही अफलातून कामगिरी केली.

  • Published by:  Suraj Yadav
राजकोट, 18 जानेवारी : भारताचा फलंदाज केएल राहुल नेहमी सलामीला खेळतो. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात मधल्या फळीत खेळला. या सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यात त्याने महत्वाची भूमिका पार पाडली. फलंदाजीनंतर त्याने दुखापतीमुळे बाहेर असलेल्या पंतची यष्टीरक्षणाची जबाबदारीही यशस्वीपणे पार पाडली. केएल राहुलने राजकोटमधील एकदिवसीय सामन्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 52 चेंडूत 80 धावांची खेळी केली. यामध्ये सहा चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. एवढंच नाही तर त्यानं यष्टीरक्षणातही कमाल केली. केएल राहुलने यष्टीरक्षण करताना दोन झेल आणि एक गडी यष्टीचित केला. त्यात अॅरॉन फिंचसारखी महत्वाची विकेट काढल्यानं भारताचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. त्याने पहिल्या एकदिवसीय सामन्यात शतकी खेळी केली होती.दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवल्यानंतर केएल राहुलच्या खेळीचं कौतुक होत आहे. त्याच्या कामगिरीमुळे आता ऋषभ पंतच्या जागी यष्टीरक्षण आणि  पाचव्या क्रमांकावर केएल राहुलला संधी द्यावी अशी मागणी आता चाहत्यांमधून होत आहे. सामन्यानंतर बोलताना केएल राहुल म्हणाला की, मी यापेक्षा चांगल्या सुरुवातीची अपेक्षा करू शकत नाही. प्रत्येक दिवशी मला वेगवेगळ्या भूमिका, जबाबदाऱ्या सोपवल्या जातात आणि मी त्याचा आनंद घेत आहे.भारताचा कर्णधार विराट कोहलीनेसुद्धा केएल राहुलच्या कामगिरीचे कौतुक केलं. तो म्हणाला की, सोशल मीडियावर जेव्हा आमच्या कामगिरीवर प्रतिक्रिया पाहतो तेव्हा दिसतं की लगेच लोक पॅनिक बटन दाबतात. तुमच्यासाठी मैदानावर कोणता संघ सर्वश्रेष्ठ असेल हे ठरवणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही केएल राहुलला फलंदाजी करताना पाहता तेव्हा अशा खेळाडूला बाहेर ठेवणं कठिण असतं. धोनीनं दिली होती संधी, आता विराट संपवणार ‘पुणेकर’ खेळाडूचे करिअर! मधल्या फळीत केएल राहुलची कामगिरी चांगली राहिली तर पंत आणि संघात खेळण्यासाठी उत्सुक असलेल्या संजु सॅमसनची जागा अडचणीत येऊ शकते. केएल राहुल सुरुवातीला यष्टीरक्षक म्हणूनच खेळत होता. पण राज्याच्या संघातही जास्त यष्टीरक्षक असल्याने त्यानं फलंदाजीकडे मोर्चा वळवला. त्यानंतर राष्ट्रीय संघातही धोनीसारखा दिग्गज असल्यानं यष्टीरक्षणाची फारशी संधी मिळाली नाही. मात्र जेव्हा जेव्हा त्याला यष्टीरक्षण करावं लागलं आहे तेव्हा त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे मधल्या फळीत खेळण्याचा आणि यष्टीरक्षकाचा पर्याय म्हणूनही केएल राहुल संघात आल्यास पंत आणि संजु सॅमसन यांना स्वत:ला सिद्ध करावं लागेल. फलंदाजाने 7 चेंडूत केलेली फटकेबाजी बघून कर्णधाराला बदलला निर्णय!
First published:

Tags: Kl rahul

पुढील बातम्या