मुंबई, 18 जानेवारी : भारतीय संघ गेल्या वर्षभरापासून चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार यासाठी पर्याय शोधत आहे. सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध होत असलेल्या एकदिवसीय सामन्यातही ही चिंता पहिल्या सामन्यात दिसली. दरम्यान राजकोटमधील दुसऱ्या सामन्यात श्रेयस अय्यरला चौथ्या क्रमांकावर तर केएल राहुलला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले. त्यामुळं या सामन्यातही केदार जाधवला संघात जागा मिळाली नाही. केदार जाधव गेली 4 ते 5 वर्षे तळाला फलंदाजी करीत होता. मात्र चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजासाठी केदारला संघातून डच्चू देण्यात आला. जाधवच्या जाण्याने भारताकडे सहाव्या गोलंदाजाचा पर्यायही संपुष्टात आला. केदारच्या गोलंदाजीच्या क्षमतेमुळेच तो विश्वचषकानंतरही भारतीय संघाचा सदस्य होता. पण आता असे दिसते की त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द जवळ जवळ संपत आली आहे. वाचा- खाली पडला पण कॅच नाही सोडला! रशीद खानच्या VIDEOने सोशल मीडियावर धुमाकूळ वाचा- BCCI करारात ‘मुंबईकर’ अव्वल, या चार खेळाडूंच्या पगारात वाढ कोहलीला नाही धोनीसारखा विश्वास महेंद्रसिंग धोनी कर्णधार असताना केदार जाधवनं पदार्पण केले होते. मात्र धोनीनं दाखवलेला आत्मविश्वास कोहलीमध्ये दिसत नाही आहे. धोनीने जाधवचा अनेकवेळा संघात ट्रम्पकार्ड म्हणून वापर केला. कोहलीला राहुल आणि धवन दोघांनाही संघात ठेवायचे आहे त्यामुळं जाधवसारख्या खेळाडूला ही किंमत मोजावी लागत आहे. त्यामुळं संघात असूनही त्याला संघात जागा मिळाली नाही. वाचा- धक्कादायक! पराभव झाला नाही सहन, अन् क्रिकेटपटूनं मैदानातच सोडला जीव वाचा- धोनीसह चार खेळाडूंना BCCI ने दिला डच्चू, एकाने घेतली होती निवृत्ती केदार जाधवचे एकदिवसीय करिअर 34 वर्षीय केदार जाधवनं भारतासाठी जास्त सामने खेळले नसले तरी पुढच्या वर्ल्ड कपपर्यंत भारतीय संघात असे का याबाबत शंका आहे. 2023मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप दरम्यान केदार जाधव 37 वर्षांचा असेल त्यामुळं त्याला संघात जागा मिळण्याची शक्यता कमी आहे. केदारनं आतापर्यंत 71 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात 42.31च्या सरासरीनं 102.18च्या स्ट्राईक रेटनं 1354 धावा केल्या आहेत. यात 2 शतक आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याने 27 विकेटही घेतल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







