फलंदाजाने 7 चेंडूत केलेली फटकेबाजी बघून कर्णधाराला बदलला निर्णय!

फलंदाजाने 7 चेंडूत केलेली फटकेबाजी बघून कर्णधाराला बदलला निर्णय!

इंग्लंडच्या फलंदाजाने शेवटच्या क्षणी केलेल्या फटकेबाजीनंतर कर्णधार जो रूटने डाव घोषित करण्याचा निर्णय बदलला.

  • Share this:

पोर्ट एलिजाबेथ, 18 जानेवारी : इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. यात तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडने 9 बाद 499 धावांवर डाव घोषित केला. बेन स्टोक्स आणि ओली पोप यांच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने ही धावसंख्या उभा केली. बेन स्टोक्सने 120 धावा केल्या तर पोप 135 धावांवर नाबाद राहिला. दोघांनी पाचव्या गड्यासाठी 203 धावांची भागिदारी केली. तर त्याने मार्क वूडच्या साथीने अखरेच्या 8.4 षटकांत 73 धावा केल्या. मार्क वूडने बाद होण्याआधी 23 चेंडूत 5 षटकारांसह 41 धावा केल्या.

दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मार्क वूडने तुफान फटकेबाजी केली. इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन कोणत्याही खेळाडूने 5 षटकार मारले नव्हते. यात त्याला कसिगो रबाडाच्या गोलंदाजीवर जीवदानही मिळाले. तो झेलबाद झाला होता पण नोबॉल असल्याने त्याला संधी मिळाली. त्याआधी जो रूटने डाव घोषित केला होता.

वूडला जीवदान मिळाल्यानंतर जो रूटने त्याचा निर्णय बदलला. त्यानंतर वूडने फटकेबाजी केली. त्याने या खेळीत 2 चौकारही मारले. त्याने 7 चेंडूत 38 धावा केल्या होत्या.

इंग्लंडने पहिल्या दिवशी 90 षटकांत 4 बाद 224 धावा केल्या होत्या. पण दुसऱ्या दिवशी त्यांनी सहज फलंदाजी केली. पोपने सुरुवातीला फटकेबाजी केली. मात्र शतकाच्या जवळ येताच त्याने सावध पवित्रा घेतला होता. त्याने 190 चेंडूत शतक साजरं केलं. दुसऱ्या बाजूला सॅम कर्रनने 50 चेंडूत 44 धावा केल्या. त्याने आणि पोपने सातव्या गड्यासाठी 59 धावा केल्या. यामध्ये पोपच्या फक्त 13 धावा होत्या.

धोनीनं दिली होती संधी, आता विराट संपवणार ‘पुणेकर’ खेळाडूचे करिअर!

Tags:
First Published: Jan 18, 2020 10:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading