मुंबई, 19 फेब्रुवारी : दिल्ली येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला नमवत विजय मिळवला आहे. भारताचा या कसोटी मालिकेतील सलग दुसरा विजय असून कांगारूंनी विजयासाठी दिलेले 115 धावांच आव्हान भारताने पूर्ण केलं आहे. भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने विजय मिळवला.
नागपूर येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याप्रमाणेच दिल्ली येथील कसोटी सामन्यातही भारताने तिसऱ्याच दिवशी विजय मिळवला. काल दुसऱ्या दिवसाच्या अंती ऑस्ट्रेलियाने 1 बाद 61 धावा करत 62 धावांची आघाडी घेतली होती. परंतु तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला भारताच्या घातक गोलंदाजी समोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज टिकू शकले नाहीत. सुरुवातीच्या षटकात भारताचा अनुभवी गोलंदाज आर अश्विनने ट्रॅव्हिस हेडला आणि स्टीव्हन स्मिथ या फलंदाजांचा बळी घेऊन त्यांना तंबूत धाडले.
हे ही वाचा : Ranji Trophy Final : बंगालला नमवून सौराष्ट्राने रणजी ट्रॉफीवर कोरलं नाव
अश्विननंतर रवींद्र जडेजाने आपला धडाका सुरु केला. त्याने एकामागोमाग एक अश्या 7 फलंदाजांची विकेट घेतली. त्यापैकी पीटर हँड्सकॉम्ब पॅट कमिन्स यांना लागोपाठ तर शून्यावर बाद केले. भारताच्या भेदक गोलंदाजी समोर ऑस्ट्रेलियाचा संघ अवघ्या 113 धावा करू शकला. ऑस्ट्रेलिया ने पहिल्या डावात 1 धावांची आघाडी मिळून तर दुसऱ्या डावात 113 धावा करत भारतासमोर विजयासाठी 115 धावांच आव्हान ठेवलं.
ऑस्ट्रेलियाने दिलेले आव्हान पूर्ण करताना भारतीय संघाची सुरुवात देखील खराब झाली. भारताचा उपकर्णधार के एल राहुल केवळ एक धावा करून बाद झाला. तर त्यापाठोपाठ रोहित शर्मा देखील 31 धावा करून बाद झाला. विराट कोहलीने भारताच्या धाव संख्येत 20 धावांचे योगदान दिले. तर श्रेयस अय्यर 12 धावा करून बाद झाल्यानंतर भारताचा डाव सावरू पाहणाऱ्या चेतेश्वर पूजाला श्रीकरने साथ दिली. चेतेश्वर पुजाऱ्याने नाबाद 31 तर श्रीकरने नाबाद 23 धावा करून ऑस्ट्रेलियाने दिलेले आव्हान पूर्ण करून भारताला विजय मिळून दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, India vs Australia, Rohit sharma, Team india, Test cricket, Virat kohli