मुंबई, 17 मार्च : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून वनडे मालिकेला सुरुवात झाली आहे. वनडे मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत असून भारतीय संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली सामना खेळत आहे. अशातच मागील अनेक महिन्यांपासून वाईट फॉर्मातून जात असलेल्या के एल राहुलने विकेट किपींगमध्ये आपले कौशल्य दाखवले आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ याची कॅच घेण्यासाठी हवेत मारलेली उडी पाहून प्रेक्षकांना धोनीची आठवण आली.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताचा स्टार फलंदाज के एल राहुल संघासाठी अपेक्षित धावा करण्यास फ्लॉप ठरला. त्यामुळे इंदूर आणि अहमदाबाद येथील कसोटी सामन्यात राहुल ऐवजी युवा क्रिकेटर शुभमन गिलला संधी देण्यात आली. त्यामुळे के एल राहुलचे चाहते नाराज झाले होते. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनंतर के एल राहुल आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे मालिकेत खेळत असून त्याने भारताच्या क्षेत्ररक्षण दरम्यान विकेट किपीरची भूमिका पारपडली.
विराट किंवा धोनी नाही तर हा खेळाडू आहे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर
13 व्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्या बॉलिंगला आला असताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि मिचेल मार्शल हे दोघे मैदानात फलंदाजी करत होते. अशातच हार्दिक पांड्याच्या चेंडूवर स्टीव्ह स्मिथ शॉट मारायला गेला असता मागे उभ्या असलेल्या के एल राहुलने हवेत उडी मारत ही कॅच पकडली. एम एस धोनीने देखील अनेकदा विकेटकिपींग करीत असताना अश्या अनेक धाडसी कॅच पकडल्या आहेत. त्यामुळे के एल राहुलचा ही कॅच पाहून प्रेक्षकांना धोनीची आठवण आली.
Edged and taken!@hardikpandya7 strikes and how good was that grab behind the stumps from @klrahul 💪
Steve Smith departs. Watch his dismissal here 👇👇#INDvAUS @mastercardindia pic.twitter.com/yss3sj4N4z — BCCI (@BCCI) March 17, 2023
Virat Kohli's slashing four off Oshane Thomas?
MS Dhoni's 89-metre maximum? The #TeamIndia wicket-keeper's incredible diving catch? Which gets your vote for the @Nissan Play of the Day? Have your say here: https://t.co/soGwNWH7eR pic.twitter.com/sPW1wqsrZX — Bharat Yadav BJP 🇮🇳 (@yadavbharatbjp) June 27, 2019
भारतीय गोलंदाजांनी आपल्या भेदक गोलंदाजीने 35.4 ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला सर्व बाद करून 188 धावांवर रोखले. आता भारतासमोर मालिकेतील पहिला वनडे सामना जिंकण्यासाठी 189 धावांचे आव्हान असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs Australia, Kl rahul, MS Dhoni, Steven smith, Team india, Wankhede stadium