सचिन तेंडुलकर : CEO वर्ल्ड मॅगझीनच्या अहवाल अनुसार भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट आहे. सचिनने 16 नोव्हेंबर 2013 रोजी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. तरी देखील सचिन तेंडुलकरची प्रसिद्धी, त्याला मिळणारे ब्रँड इंडोर्समेंटस आणि व्यवसाय इत्यादींमुळे सचिनची वार्षिक कमाई ही जवळपास 1402 कोटींच्या घरात आहे.
महेंद्र सिंह धोनी : भारताचा माजी क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी हा क्रिकेटर्समध्ये कमाईच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे. धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी रिटायरमेंट जाहीर केली होती. धोनी सध्या आयपीएलमध्ये खेळताना दिसत असून ब्रँड इंडोर्समेंटस, व्यवसाय इत्यादींमधून त्याचे वार्षिक उत्पन्न सुमारे 949 कोटीं आहे.