नवी दिल्ली, 30 मार्च: कॅरेबियन स्फोटक फलंदाज ख्रिस गेल (Chris Gayle) पुन्हा एकदा आयपीएलच्या मैदानात खेळताना दिसणार आहे. पोस्ट शेअर करत त्याने आपल्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे. मागीलवर्षी पंजाब संघाला धक्का देत ख्रिस गेल (Chirs Gayle) याने संपूर्ण आयपीएल स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. आता आयपीएल सीझन 15 खेळवण्यात येत आहे. अशातच गेलने पोस्ट करत आयपीएलच्या मैदानात पुन्हा उतरणार असल्याचे संकेत दिले आहेत. घरच्या मैदानात पाकिस्तानची लाज गेली, ऑस्ट्रेलियानं केला सर्वात मोठा पराभव गेलनने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. ज्यामध्ये तो वर्कआऊट करताना दिसत आहे. वर्कआऊट दरम्यान मिरर सेल्फी घेत एक स्टोरी अपलोड केली आणि ‘वर्क आत्ताच सुरु झाले आहे. आयपीएलच्या पुढील वर्षाची तयारी’ असे कॅप्शनमध्ये म्हटले आहे. युनिव्हर्स बॉलच्या या कॅप्शनने चाहत्यांना नक्कीच आनंदाची बातमी दिली आहे. पण आता हे बघायचे आहे की गेलने दिलेले कॅप्शन चाहत्यांसाठी चेष्टा ठरतीय का तो खरोखरच आयपीएलच्या पुढील हंगामाची तयारी करत आहे.
ख्रिस सोशल मीडियावर मजेदार ट्विट आणि फोटो शेअर करण्यासाठी ओळखला जातो. या मोसमात गेल जरी आयपीएल खेळत नसला तरी आयपीएलच्या इतिहासात त्याने केलेले पराक्रम चाहते नक्कीच विसरणार नाहीत. गेलने आयपीएलमध्ये एकूण 357 षटकार मारले आहेत, जो आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी इनिंग खेळण्याचा विक्रमही गेलच्या नावावर आहे. गेलने 2013 मध्ये पुणे वॉरियर्सकडून खेळताना बेंगळुरूविरुद्ध 175 धावांची नाबाद खेळी खेळली होती. गेलची अनुपस्थिती चाहत्यांना नक्कीच निराश करणारी आहे. ख्रिस गेलने 142 आयपीएल सामन्यांमध्ये 4965 धावा केल्या आहेत. आयपीएलच्या इतिहासात गेलच्या नावावर सर्वाधिक शतके आहेत. गेलने आयपीएलमध्ये 6 शतके झळकावली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे, ज्याने आयपीएलमध्ये 5 शतके झळकावली आहेत.