जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / घरच्या मैदानात पाकिस्तानची लाज गेली, ऑस्ट्रेलियानं केला सर्वात मोठा पराभव

घरच्या मैदानात पाकिस्तानची लाज गेली, ऑस्ट्रेलियानं केला सर्वात मोठा पराभव

घरच्या मैदानात पाकिस्तानची लाज गेली, ऑस्ट्रेलियानं केला सर्वात मोठा पराभव

ऑस्ट्रेलियाची पाकिस्तान दौऱ्यातील दमदार कामगिरी सुरूच आहे. वन-डे सीरिजमधील पहिल्या मॅचमध्ये (Pakistan vs Australia)ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा 88 रननं पराभव केला. हा पाकिस्तानचा घरच्या मैदानातील सर्वात मोठा पराभव आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 मार्च : ऑस्ट्रेलियाची पाकिस्तान दौऱ्यातील दमदार कामगिरी सुरूच आहे. वन-डे सीरिजमधील पहिल्या मॅचमध्ये (Pakistan vs Australia)ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा 88 रननं पराभव केला. हा पाकिस्तानचा घरच्या मैदानातील सर्वात मोठा पराभव आहे. ओपनर ट्रेविस हेडच्या (Travis Head) आक्रमक शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा बॅटींग करत 7 आऊट 313 रन केले. त्याला उत्तर देताना पाकिस्तानची टीम फक्त 225 रन करू शकली. या विजयासह ऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा पाकिस्तानमध्ये सलग पाचव्या वन-डेमध्ये पराभव केला आहे. 314 रनचा पाठलाग करताना पाकिस्ताननं सुरूवात चांगली केली. त्यांचा स्कोर एक आऊट 120 इतका होता. त्यानंतर पुढील 105 रनमध्ये त्यांनी 9 विकेट्स गमावल्या. ओपनर बॅटर फखर जमां 18 बॉलमध्ये 18 रन काढून आऊट झाला. त्यानंतर इमाम उल हक आणि कॅप्टन बाबर आझम यांनी दुसऱ्या विकेटसाठी 96 रनची भागिदारी केली. बाबरनं 72 बॉलमध्ये 57 रन केले. त्याने यावेळी वन-डे क्रिकेटमधील 4 हजार रन देखील पूर्ण केले. झम्पा चमकला ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर अ‍ॅडम झम्पानं मिडल ओव्हर्समध्ये अचूक बॉलिंग करत पाकिस्तानी बॅटर्सना जखडून ठेवले. इमाम उल हक एका बाजूनं उभा होता. पण, त्याला अन्य कुणी साथ दिली नाही. इमामनं 96 बॉलमध्ये 103 रन काढले. पाकिस्तानच्या 6 जणांना 2 अंकी रन करता आले नाहीत. संपूर्ण टीम 45.2 ओव्हर्समध्ये 225 रन काढून आऊट झाली. झम्पानं 10 ओव्हर्समध्ये 38 रन देत 4 विकेट्स घेतल्या. स्विप्सन आणि हेडला प्रत्येकी 2 विकेट मिळाल्या. IPL 2022 : SRH ची नव्या मोसमातही जुनीच कामगिरी, राजस्थानचा दणदणीत विजय यापूर्वी टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटींगला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला ट्रेविस हेडनं दमदार सुरूवीात करून दिली. त्याने कॅप्टन आरोन फिंचसोबत पहिल्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. हेडनं 72 बॉलमध्ये 101 रन केले. त्याने 12 फोर आणि 3 सिक्स लगावले. फिंच 23 रन काढून आऊट झाला. नंबर 3 वर बॅटींगसाठी आलेल्या बेन मॅकडमॉटनं 72 बॉलमध्ये 55 रन काढले. शेवटच्या ओव्हर्समध्ये कॅमेरून ग्रीननं 30 बॉलमध्ये नाबाद 40 रन करत ऑस्ट्रेलियन टीमला 300 रनचा टप्पा ओलांडून दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात