मेलबर्न, 09 मार्च : आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा जिंकत ऑस्ट्रेलिया पाचव्यांदा जगज्जेता झाला. ऑस्ट्रेलियानं अंतिम सामन्यात भारताला हरवतं, वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली. भारताचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले असले तरी भारताला शेफाली वर्मासारखे अनेक स्टार खेळाडू मिळाले. मात्र या वर्ल्ड कप दरम्यान ऑस्ट्रेलियानेही एक खास खेळाडू शोधला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रेट लीनं एक व्हिडीओ शेअर केला होता. यात 6 वर्षांची तनिषा सेन फलंदाजी करताना दिसत आहे. ब्रेट लीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तनिषा स्ट्रेट ड्राइव्ह मारताना दिसत आहे. ब्रेट लीनं तनिषाला गोलंदाजी करताना, तिला सचिनची उपमा दिली. एवढेच नाही तर तनिषाला गोलंदाजी करताना ब्रेट ली घाबरलाही होता. यावेळी ली ने, “मला खुप भीती वाटत आहे, कारण ही मुलगी सचिन सारखी फलंदाजी करत आहे”, असे या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. वाचा- VIDEO : इरफान पठाणच्या लेकानं सचिनसोबत केली मारामारी आणि…
वाचा- VIDEO : ..अन् क्रिकेटरनं जगज्जेतेपदाचं सुवर्णपदक घातलं दिव्यांग चाहतीच्या गळ्यात ब्रेट लीने तनिषाचे कौतुक करत तिच्या आवडत्या शॉट बद्दलही विचारले. तनिषाचे आवडता शॉट कव्हर ड्राइव्ह असून स्मृती मानधना तिची आवडती खेळाडू आहे. या सहा वर्षांच्या मुलीचे शॉट पाहून जगभरातल्या चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे. तर, तानिषा भारतीय वंशाची असल्यामुळं काही चाहत्यांनी ही भारताकडून खेळणार की ऑस्ट्रेलियाकडून? असा सवाल विचारला आहे. वाचा- तिघींपेक्षा शेफालीची कामगिरी सरस, टीम इंडियाच्या पराभवासाठी ‘हे’ ठरलं मोठं कारण
A six-year-old, holding her own against @BrettLee_58 👀 @Neroli_Meadows introduces us to a star of the future, @Taanisha_Sen 🌟 pic.twitter.com/0xgljgt2FP
— T20 World Cup (@T20WorldCup) March 6, 2020
वाचा- VIDEO : एकटी लढली पण फायनलचा पराभव लागला जिव्हारी, शेफाली मैदानावरच रडली भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात भारताला 85 धावांची पराभव सहन करावा लागला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने 184 धावा केल्या, तर भारतीय संघाला केवळ 99 धावा करता आल्या. त्यामुळं भारताचे पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले.