मेलबर्न, 08 मार्च : महिला टी20 वर्ल्ड कप पाचव्यांदा जिंकण्याची कामगिरी ऑस्ट्रेलियाने केली. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाना भारताला 85 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात सलामीवी एलिसा हिली आणि बेथ मूनी यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं 20 षटकांत 4 बाद 184 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी मैदानावर फक्त हजेरीच लावण्याचं काम केलं.
ऑस्ट्रेलियाच्या संघाला विजयानंतर सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आलं. त्यानंतर खेळाडूंनी चाहत्यांशीही संवाद साधला. तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या सोफी मोलीन्यूक्सने केलेल्या एका गोष्टीचं कौतुक सगळेच करत आहे. सोफीला भेटण्यासाठी एक दिव्यांग चाहती आली होती. व्हिलचेअरवरून आलेल्या चाहतीची भेट सोफीने घेतली. त्यावेळी विचारपूस करताना सोफीने स्वत:च्या गळ्यातलं सुवर्णपदक काढून चिमुकलीच्या गळ्यात घातलं. त्यानंतर सोफीने तिच्यासोबत एक फोटोही काढला. यामुळे सोफीचं कौतुक केलं जात आहे. तिचा हा व्हिडिओसुद्धा व्हायरल होतं आहे.
What an amazing gesture by Sophie Molineux ❤️
— T20 World Cup (@T20WorldCup) March 8, 2020
Australia, winners on and off the field 👏#T20WorldCup pic.twitter.com/XBLGLiR2bi
अंतिम सामन्यात भारताला फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. भारताच्या सुमार क्षेत्ररक्षणामुळे ऑस्ट्रेलियानं 184 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या भारताला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. शेफाली वर्मा फक्त दोन धावांवर बाद झाली. संपूर्ण स्पर्धेत फॉर्ममध्ये असलेल्या शेफाली वर्मावरच भारतीय फलंदाजीची मदार होती. त्यानंतर तानिया भाटिया रिटायर्ड हर्ट झाली तर जेमिमाह शून्यावर बाद झाली. त्यामुळे भारताची अवस्था 2 बाद 8 अशी झाली. त्यानंतर स्मृती मानधनाही 11 धावांवर झेलबाद झाली.
पाहा VIDEO : एकटी लढली पण फायनलचा पराभव लागला जिव्हारी, शेफाली मैदानावरच रडली
भारताला सगळ्यात जास्त अपेक्षा असलेल्या कर्णधार हरमनप्रीत कौरला या सामन्यातही चांगली कामगिरी करता आली नाही. हरमनप्रीत कौर 4 धावांवर बाद झाली आहे. हरमन बाद झाल्यानंतर वेदा कृष्णामुर्ती आणि दीप्ती शर्मा यांनी काही अंशी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र जोनासनने जबरदस्त कॅच घेत वेदा कृष्णामुर्तीला 16 धावांवर बाद केले. त्यानंतर दीप्ति शर्माने 33 धावांची खेळी करत भारताचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र निकोला कॅरीने शर्माला बाद करत भारताला आणखी एक झटका दिला. दीप्ति शर्मा वगळता भारताच्या एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही.
हे वाचा : Women's T20 World Cup : पराभवानंतरही टीम इंडियावर खूश शरद पवार, म्हणाले...
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket