मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /वडिलांनी क्रिकेट खेळू दिलं नाही म्हणून गेली पळून आणि...

वडिलांनी क्रिकेट खेळू दिलं नाही म्हणून गेली पळून आणि...

ICC Women's T20 World Cup 2020 मध्ये पहिल्याच सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. यात गोलंदाज पूनम यादवने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला खिंडार पाडून भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला.

ICC Women's T20 World Cup 2020 मध्ये पहिल्याच सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. यात गोलंदाज पूनम यादवने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला खिंडार पाडून भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला.

ICC Women's T20 World Cup 2020 मध्ये पहिल्याच सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. यात गोलंदाज पूनम यादवने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला खिंडार पाडून भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला.

सिडनी, 21 फेब्रुवारी : महिला टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताने पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. त्यांच्या घरच्या मैदानावर भारतानं 17 धावांनी विजय मिळवला. या विजयाची शिल्पकार ठरली ती गोलंदाज पूनम यादव. भारताने दिलेल्या 132 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलिया सहज पार करेल असं वाटत होतं. पण सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व राखलं. ऑस्ट्रेलियाची यष्टीरक्षक अॅलेसा हिलीने एकाकी किल्ला लढवला पण पूनम यादवने तिला बाद करून मोठा अडथळा दूर केला. पूनमने या सामन्यात 4 षटकात 19 धावा देत 4 विकेट घेतल्या. या जोरावर भारताने जग्गजेत्या ऑस्ट्रेलियाला 17 धावांनी पराभूत केलं.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येण्याआधीपासून पूनम रेल्वेमध्ये ज्यूनिअर क्लार्कची नोकरी करत आहे. आपली नोकरी सांभाळत तिने क्रिकेटमध्ये कमाल केली आहे. पूनमचे वडिल आरबी सिंग हे निवृत्त सैन्य अधिकारी आहेत. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, लहानपणापासून पूनमला स्पोर्टसची आवड होती. एकदा तिच्यासाठी सलवार सूट खरेदी केला तर ती रडायला लागली. त्यावेळी मुलींसारखे कपडे मला चांगले वाटत नाहीत मला शर्ट पँट हवी असा हट्ट तिने धरला होता.

वयाच्या आठव्या वर्षी पूनमने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यावेळी लोकांनी टोमणे मारले. मुलगी मोठी झालीय तिला खेळायला पाठवणं सुरक्षित नाही, बदनामी होईल असं बोलू लागले. त्यावेळी तिचं क्रिकेटही बंद केल्याचं वडिलांनी सांगितलं.

एकेदिवशी पूनम हळूच स्टेडियममध्ये पळून गेली. तिथून ती प्रशिक्षक हेमलता काला यांना घेऊन घरी आली. त्यावेळी पूनमच्या वडिलांना हेमलता यांनी समजावलं की मुलींचे करिअर सेफ आहे. त्यांनंतर पूनमच्या वडिलांनी तिला खेळण्यासाठी परवानगी दिली.

वाचा : वर्ल्ड कपमध्ये भारताच्या महिला संघाने वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला लोळवलं

पूनम वयाच्या आठव्या वर्षापासून क्रिकेटसाठी मेहनत घेत आहे. दररोज पहाटे 4 वाजता तिचा दिनक्रम सुरू व्हायचा. दोन तास स्टेडियममध्ये सराव केल्यानंतर 6 वाजता शाळेला जाण्यासाठी तयार व्हायचं. त्यानंतर पुन्हा संध्याकाळी क्रिकेटचा सराव. तिच्या दिवसभराच्या कामात फक्त क्रिकेट आणि अभ्यास एवढंच असायचं.

वाचा : विराटला आऊट करण्यासाठी टेलरने हाताने नाही तर पोटाने घेतला कॅच? पाहा मजेशीर VIDEO

सुरुवातीला पूनमची निवड आग्र्याच्या संघात झाली. त्यानंतर उत्तर प्रदेशच्या संघाकडून ती खेळली. पूनमने भारताच्या अंडर 19 संघाचे नेतृत्वही केलं आहे. भारताकडून 2013 मध्ये तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर पहिल्या एकदिवसीय सामन्यात तिने धमाकेदार कामगिरी केली होती. तेव्हा तिने 15 धावा देत 3 गडी बाद केले होते.

वाचा : ‘IPLसाठी चिअर गर्ल्स मिळाल्या’, पाक महिला संघाच्या त्या डान्सवर भडकले चाहते

First published:
top videos

    Tags: Cricket, Poonam yadav