सिडनी, 21 फेब्रुवारी : महिला टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताने पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. त्यांच्या घरच्या मैदानावर भारतानं 17 धावांनी विजय मिळवला. या विजयाची शिल्पकार ठरली ती गोलंदाज पूनम यादव. भारताने दिलेल्या 132 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलिया सहज पार करेल असं वाटत होतं. पण सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व राखलं. भारताने दिलेल्या 133 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला 115 धावांपर्यंत मजल मारता आली. 13 षटकांत ऑस्ट्रेलियाची अवस्था 5 बाद 77 अशी झाली होती. ऑस्ट्रेलियाची यष्टीरक्षक अॅलेस्सा हिलीने एकाकी झुंज दिली. तिने अर्धशतकी खेळी केली. हिली वगळता इतर फलंदाजांनी मैदानावर हजेरी लावायचे काम केले. सहाव्या षटकात बेथ मूनी 6 धावांवर बाद झाली. त्यानंतर मेग लेनिंगला गायकवाडने बाद केलं. तिने फक्त 5 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या हिलीला पूनम यादवने स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल घेत बाद करून मोठा अडथळा दूर केला. ऑस्ट्रेलियाकडून अलेसा हिली हिने सर्वाधिक 51 तर अश्ले गार्डनर हिने 34 धावा काढल्या. या दोघींव्यतिरिक्त एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. ऑस्ट्रेलियाचे फलंदाज एकापाठोपाठ बाद होत असताना अॅश्ले गार्डनरने दुसऱ्या बाजुमे सावध फटकेबाजी केली. मात्र गार्डनरला बाद करून शिखाने भारताच्या विजयाची वाट मोकळी केली. भारताकडून पूनम यादवने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर शिखा पांडेने 3 आणि राजेश्वरी गायकवाडने 1 गडी बाद केला. हिली बाद झाल्यानंतर पूनम यादवने पूढच्या षटकात ऑस्ट्रेलियाला सलग दोन धक्के दिले. राशेल हायनेस आणि इलीस पेरी यांना लागोपाठ दोन चेंडूवर बाद केली. तिला हॅट्ट्रिकची संधी होती मात्र तानिया भाटियाने झेल सोडला. ऑस्ट्रेलियाची एक बाजू लावून धरणाऱ्या अॅलिसा हिलीशिवाय इतर फलंदाज फार काळ टिकू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाकडून तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 बाद 132 धावा केल्या. भारताची सुरुवात अडखळत झाली. आघाडीचे तीन फलंदाज लागोपाठ बाद झाले. स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी 41 धावांची भागिदारी केली. स्मृती मानधना बाद झाल्यानंतर शेफाली आणि हरमनप्रीत कौर लगेच बाद झाल्या. स्मृती मानधना 10 धावांवर बाद झाली. तिच्यानंतर शेफाली 29 धावा करून झेलबाद झाली. त्यानंतर पुढच्याच षटकात हरमनप्रीत कौर अवघ्या दोन धावांवर बाद झाली. भारताची अवस्था एकवेळ 3 बाद 47 अशी झाली होती. त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज आणि दिप्ती शर्मा यांनी सूत्रे हाती घेतली. दोघींनी अर्धशतकी भागिदारी केली. जेमिमा 16 व्या षटकात 26 धावांवर बाद झाली. त्यानंरत वेदा कृष्णमूर्तीसोबत दिप्तीने संघाची धावसंख्या 132 पर्यंत नेली. दिप्ती 49 धावांवर तर वेदा 9 धावांवर नाबाद राहिली. भारतीय संघाला आपल्या फॉर्ममध्ये सातत्य राखता आलेले नाही. त्यामुळं ऑस्ट्रेलिया पराभूत करणे भारतासमोर मोठे आव्हान असणार आहे. याआधी ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात तिरंगी मालिकेतील अंतिम सामन्यात टक्कर झाली होती. मात्र अंतिम सामन्यात भारतीय फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही, त्यामुळं यजमान संघाकडून पराभव पत्करावा लागला.
A pulsating start to the #T20WorldCup
— T20 World Cup (@T20WorldCup) February 21, 2020
Shafali Verma got India off to a blistering start before Jess Jonassen pulled them back. Jemimah Rodrigues and Deepti Sharma helped India recover, and Australia need 133 to win.
Who's ahead at this stage?#AUSvIND pic.twitter.com/6esj9zLiZE
ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत चार वेळा चार टी -20 वर्ल्ड कप जिंकले आहेत. तर भारतीय संघाला एकदाही वर्ल्ड कप फायनलपर्यंत मजल मारला आलेली नाही आहे. त्यामुळं ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी भारताच्या आघाडीच्या आणि मधल्या फळीला चांगली कामगिरी करावी लागणआर आहे. 16 वर्षीय शेफाली वर्माकडून भारताला चांगली सुरुवात अपेक्षित आहे. तर स्मृती मांधनाचा फॉर्म भारताची जमेची बाजू आहे. त्याचबरोबर सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या कर्णधार हरमनप्रीत कौरकडूनही चांगली कामगिरीची अपेक्षा केली जाईल. भारतीय संघाने मागील वेळेप्रमाणे सेमीफायनलपर्य़ंत मजल मारणे अपेक्षित आहे, यामुळं महिला क्रिकेटचे नवे पर्व सुरू होईल. यासाठी फलंदाजीचा दृष्टीकोन बदलने गरजेचे आहे. भारतीय संघ- शेफाली वर्मा, स्मृती मांधना, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दिप्ती शर्मा, शिखा पांडे, वेदा कृष्णामूर्ति, तानिया भाटिया, तानिया भाटिया, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड. ऑस्ट्रेलिया : मेग लॅनिंग (कर्णधार) एरिन बर्न्स, निकोला कारे, एश्ले गार्डनर, रशेल हॅंस, एलिसा हीली, जेस जोनासन, डेलिसा किमिंसे, सोफी एम, बेथ मूनी, एलिसे पॅरी, मेगान शट, एनाबेल सदरलॅंड, मोली स्ट्रानो, जार्जिया वेयरहॅम.

)







