मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

ICC U-19 Women’s T20 WC 2023 : टी२० वर्ल्ड कपमध्ये भारताच्या अंडर १९ संघाचे नेतृत्व शेफाली वर्माकडे

ICC U-19 Women’s T20 WC 2023 : टी२० वर्ल्ड कपमध्ये भारताच्या अंडर १९ संघाचे नेतृत्व शेफाली वर्माकडे

 ICC U-19 Women’s T20 World Cup 2023 : अंडर१९ टी २० महिला वर्ल्ड कपसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा बीसीसीआय़ने केलीय. भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या शेफाली वर्माकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Yadav

मुंबई, 05 डिसेंबर : महिलांचा अंडर 19 टी20 वर्ल्ड कप होणार असून बीसीसीआय़ने टीम इंडियाची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 सामन्यांच्या मालिकेसाठीसुद्धा संघ जाहीर केला आहे. आयसीसी अंडर 19 महिला टी20 वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. 14 जानेवारी ते 29 जानेवारी या कालावधीत होणाऱ्या या वर्ल्ड कपमध्ये एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिका, युएई, स्कॉटलंडसह ड गटात आहे. यातील तीन संघ सुपर सिक्स फेरीत जातील. तिथे दोन गटात त्यांचा समावेश असेल.

दोन्ही गटातील दोन संघ पुढे उपांत्य फेरीत जातील. या संघांमध्ये 27 जानेवारीला पॉचेफस्ट्रूम इथंल्या जेबी मार्क ओव्हलवर सामना खेळला जाईल. तर वर्ल्ड कपमधील अंतिम सामनासुद्धा याच मैदानात 29 जानेवारीला होणार आहे.

हेही वाचा : एम्बाप्पेने केली मेस्सीशी बरोबरी, पेले-रोनाड्लो यांना टाकले मागे

शेफाली वर्माने भारताकडून दोन कसोटी, 21 एकदिवसीय आणि 46 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिचा अनुभव भारताच्या संघाला अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये महत्त्वाचा ठरणार आहे. शेफाली वर्मा पुढच्या वर्षी 28 जानेवारीला 19 वर्षांची होणार आहे.

हेही वाचा :

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मालिकेसाठी टीम इंडिया :

शेफाली वर्मा (कर्णधार), श्वेता सेहरावत (उपकर्णधार), ऋचा घोष (यष्टीरक्षक), जी त्रिशा, सौम्या तिवारी, सोनिया मेहदिया, हर्ले गाला, हर्षिता बसू (यष्टीरक्षक), सोनम यादव, मन्नत कश्यप, अर्चना देवी , पार्शवी चोप्रा, तीता साधू, फलक नाझ, शबनम एमडी, शिखा, नजला सीएमसी, यशश्री.

हेही वाचा : भारताकडून अशा चुका अपेक्षित नव्हत्या, वासिम जाफरने सांगितली पराभवाची 3 कारणे

टी२० वर्ल्ड कपसाठी अंडर 19 भारतीय महिलांचा संघ

शेफाली वर्मा (कर्णधार), श्वेता सेहरावत (उपकर्णधार), ऋचा घोष (यष्टीरक्षक), जी त्रिशा, सौम्या तिवारी, सोनिया मेहदिया, हर्ले गाला, हर्षिता बसु, सोनम यादव, मन्नत कश्यप, अर्चना देवी, पार्शवी चोप्रा, तीता साधू, फलक नाझ, शबनम एमडी.

First published:

Tags: Cricket, Icc, Team india, Women