नवी दिल्ली, 01 मे : कोरोनामुळं जगभरातील सर्व सामने रद्द झाले आहेत. एकही क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येत नाही आहेत. क्रिकेट सामन्यांनाही याचा फटका बसला आहे, मात्र एकही सामना न खेळता टीम इंडियाला मात्र मोठी किंमत चुकवावी लागली आहे. आयसीसी टेस्ट रॅकिंगमध्ये भारताला आपलं पहिलं स्थान गमवावं लागलं आहे. 2016 पासून पहिल्या क्रमांकावर असलेल्या भारतीय संघ आता कसोटी रॅकिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. सध्या पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया (116) तर दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा (115) संघ आहे. तर, टी-20 रॅकिंगमध्ये पाकिस्तानला मागे टाकत ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. एकदिवसीय रॅकिंगमध्ये इंग्लंड पहिल्या क्रमांकावर काय आहे. कसोटी रॅकिंगमध्ये असलेल्या पहिल्या तीन संघांमध्ये पहिल्यांदाच कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. भारतानं पहिले स्थान गमावण्यामागचे मुख्य कारण म्हणजे 2016-17मध्ये भारतानं केवळ एक सामना गमावला होता तर 12 सामन्यात विजय मिळवला होता. मात्र न्यूझीलंड दौऱ्यात भारतानं निराशाजनक कामगिरी केली. असे असले तरी टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये भारतीय संघ अजूनही पहिल्या क्रमांकावर कायम आहे. वाचा- कोरोनामुळं बदलणार क्रिकेटचे हे नियम? सचिनने दिले संकेत
वाचा- …तर वर्षभर एकही क्रिकेट सामना होणार नाही, दिग्गज क्रिकेटपटूचा धक्कादायक खुलासा एकदिवसीय रॅकिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंड (127) पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर भारत आणि न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर टी-20 रॅकिंगमध्ये 278 गुणांसह ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आहे. 2011नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला प्रथम स्थान मिळवता आले आहे. भारतीय संघ टी-20 रॅकिंगमझ्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. वाचा- कोरोनामध्येही ‘हा’ देश IPLचे आयोजन करण्यास तयार, BCCIला पाठवला प्रस्ताव संपादन, संकलन-प्रियांका गावडे