कोरोनामुळं बदलणार क्रिकेटचे हे नियम? सचिनने दिले संकेत

कोरोनामुळं बदलणार क्रिकेटचे हे नियम? सचिनने दिले संकेत

क्रिकेट चाहत्यांना येत्या काळात कोरोनामुळे खेळात मोठे बदल पाहायला मिळतील. याविषयी सचिनने माहिती दिली.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 एप्रिल : कोरोनामुळं सर्व जग ठप्प झाले आहे. अर्थात याचा परिणाम क्रीडा क्षेत्रालाही झाला. कोरोनामुळे जगभरातील सर्व क्रिकेट सामने रद्द झाले आहेत. जवळजवळ 3-4 महिने ते होतील याची शक्यताही कमी आहे. मात्र कोरोनानंतर क्रिकेट सामने सुरू झाल्यासही बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागेल. याबाबत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने काही संकेत दिले.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे क्रिकेटमधील बरेच बदल होण्याची शंका व्यक्त केली जात आहे. मुख्य म्हणजे गोलंदाज चेंडू टाकण्यापूर्वी त्याला थूंकी लावतात. खरतर चेंडू चमकवण्यासाठी ही ट्रीक वापरली जाते. मात्र कोरोनानंतर हे गोलंदाजांना महागात पडू शकते. याबाबत सचिन म्हणाला की, "कोरोनानंतर क्रिकेटमध्ये सर्व काही बदलेल यात शंका नाही. चेंडू चमकत नसेल तर तो कसा प्रतिसाद देईल हे कोणालाही ठाऊक नाही".

वाचा-Happy Birthday Sachin : सचिन आणि 24 तारीख, नेमकं काय आहे रहस्य

तसेच, सचिन म्हणाला की, "कोणत्याही संघाने चेंडूवर लाळ किंवा घामाचा वापर केल्याशिवाय कोणताही सामना खेळला आहे असे मला वाटत नाही. तथापि, खेळाडूंना अंतर ठेवण्याची जाणीव असेल आणि विकेट घेतल्यानंतरही त्यांना याची काळजी घ्यावी लागेल". दरम्यान, क्रिकेट सामने सुरू झाल्यानंतर काही काळ ते बंद मैदानात म्हणजे प्रेक्षकांशिवाय होतील. याबाबत सचिन म्हणाला की, "आधी खेळायला परिस्थिती सुरक्षित आहे की नाही हे पाहावे, त्यानंतर या सगळ्याचा विचार व्हावा. जीव वाचविणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे". कोरोनामुळे सध्या भारतातील सर्वात मोठी क्रिकेट लीग 3 मेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

वाचा-...तर वर्षभर एकही क्रिकेट सामना होणार नाही, दिग्गज क्रिकेटपटूचा धक्कादायक खुलासा

मदत करण्याच्या स्थितीत भारत

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली संकटसमयी मोठी भूमिका निभावण्याच्या प्रश्नावर सचिन म्हणाला की, "क्रिकेटपटू इतर सर्व मंडळांमध्ये वेगवेगळ्या पदावर उपस्थित असतात आणि क्रिकेटशी संबंधित हा निर्णय नाही. हा मानवी निर्णय आहे". तो म्हणाला की, यावेळी तुम्ही क्रिकेटपटू असो की नाही, प्रत्येकजण तुम्हाला मदत करेल. सौरव गांगुली हा बीसीसीआयचा अध्यक्ष असून त्याचा क्रिकेटशी काही संबंध नाही. गांगुली अध्यक्ष म्हणून जे काही निर्णय घेतील ते घेतील". बीसीसीआयनं याआधी पंतप्रधान केअर फंडला 50 लाखांची मदत केली होती.

संकलन, संपादन-प्रियांका गावडे

First published: April 24, 2020, 4:14 PM IST
Tags:

ताज्या बातम्या