लंडन, 03 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये भारतानं बांगलादेशला नमवत सेमीफायनलमध्ये दणक्यात प्रवेश केला आहे. वर्ल्ड कपच्या इतिहासात तब्बल सातव्यांदा भारतीय संघानं सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर, यात तीन वेळा भारत फायनलपर्यंत पोहचला आहे. त्यामुळं आता भारत फायनल गाठणारा का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळं भारत सेमीफायनलमध्ये कोणाविरुद्ध भिडणार हे महत्त्वाचे आहे. बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतानं 315 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे बांगलादेशला केवळ 286 धावांपर्यंत मजल मारता आली. या विजयासह भारताने सेमीफायनलचं तिकीट पक्कं केलं आहे तर बांगलादेशच्या आशा संपुष्टात आल्या. गुणतालिकेत अशी आहे भारताची अवस्था भारतीय संघानं आतापर्यंत 8 सामन्यात आतापर्यंत 6 सामने जिंकले आहेत तर एक सामना पावसामुळं रद्द झाला. त्यामुळं 13 गुणांसह भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. भारताचा श्रीलंकेविरोधात एक सामना बाकी आहे, त्यामुळं हा सामना जिंकत भारताचे 15 गुण होऊ शकतात. मात्र तरी, भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर येईल याबाबत शाश्वती नाही, कारण ऑस्ट्रेलिय़ा सध्या 14 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे आणि त्यांचा दक्षिण आफ्रिकेविरोधात एक सामना शिल्लक आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या टॉपवर ऑस्ट्रेलियाचा संघ 14 गुणांसह सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा तो पहिला संघ आहे. ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यास ते 16 गुणांसह पहिल्या क्रमांकावर राहतील. जर, ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेविरोधात सामना गमावला आणि भारतानं श्रीलंकेविरोधात सामना जिंकल्यास भारत पहिल्या क्रमांकावर येईल. या संघांविरोधात भारताची होणार सेमीफायनलमध्ये लढत भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता जास्त आहे. भारतीय संघ जर दुसऱ्या क्रमांकावर असेल तर त्यांचा सामना गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघाशी भिडणार आहे. सध्या गुणतालिकेत न्यूझीलंडचा संघ 11 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. आज न्यूझीलंडचा सामना इंग्लंडशी होणार आहे. जर ते सामना जिंकले तरी गुणातालिकेत तिसऱ्या क्रमांकावर कायम राहतील त्यामुळं भारताचा सामना न्यूझीलंडशी होऊ शकतो. इंग्लंडशी होणार टक्कर? आज इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्याशी सामना होणार आहे. तर इंग्लंडनं हा सामना जिंकला तर ते 12 गुणांसह सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील आणि गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर येतील. त्यामुळं भारत आणि इंग्लंड यांच्यातही सामना होऊ शकतो. पाक विरोधातला सामना जर-तरवर पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी आता एका चमत्काराची गरज आहे. पाकिस्ताननं सेमीफायनलमध्ये प्रवेश केला तरी, ते चौथ्या क्रमांकावर असतील. त्यामुळं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होण्याची शक्यता कमीच आहे. वाचा- World Cup : पंचांशी हुज्जत, विराटवर होऊ शकते सामनाबंदीची कारवाई! वाचा- World Cup Point Table : भारताची सेमीफायनलला धडक, तीन संघांमध्ये चुरस! वाचा- World Cup : हिटमॅनला जीवदान मिळालं की शतक होणार हे नक्की! भिंतीत लपून बसलेल्या अजगराच्या सुटकेचा थरार, पाहा VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.