World Cup Point Table : भारताची सेमीफायनलला धडक, तीन संघांमध्ये चुरस!

ICC Cricket World Cup भारताच्या विजयानं बांगलादेशचं आव्हान संपुष्टात आलं आहे. आता दोन जागांसाठी तीन संघांमध्ये चुरस बघायला मिळणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 3, 2019 07:40 AM IST

World Cup Point Table : भारताची सेमीफायनलला धडक, तीन संघांमध्ये चुरस!

इंग्लंडविरुद्ध पराभवानंतर भारताने बांगलादेशवर विजय मिळवून सेमीफायनलला धडक मारली आहे. 13 गुणांसह भारत दुसऱ्या स्थानावर आहे. या विजयाने बांगलादेशचं आव्हान संपुष्टात आलं.

वेस्ट इंडिजला पराभूत करून लंकेनं सेमीफायनलच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. सध्या त्यांचे 8 गुण झाले असून पुढच्या सामन्यात त्यांना भारताशी सामना करावा लागेल. यात त्यांना मोठा विजय मिळवल्यानंतरही बांगलादेश आणि पाक आणि इंग्लंड यांचा एक पराभव तोसुद्धा मोठ्या फरकाने होण्याची प्रार्थना करावी लागेल.

ऑस्ट्रेलियायाने इंग्लंडपाठोपाठ न्यूझीलंडचा पराभव करून गुणतक्त्यात 14 गुणांसह पहिलं स्थान कायम राखलं आहे. ऑस्ट्रेलियाने सेमिफायनलला स्थान पक्कं केलं आहे. तिसऱ्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडची पुढची लढत इंग्लंडशी आहे.

न्यूझीलंडचे 11 गुण झाले आहेत. त्यांचा एक सामना बाकी असून यात त्यांना विजय मिळवावा लागेल. या सामन्यावर इंग्लंड आणि पाकच्या सेमीफायनल प्रवेशाचं गणित ठरणार आहे.

यूझीलंडचे 11 गुण झाले आहेत. त्यांचा एक सामना बाकी असून यात त्यांना विजय मिळवावा लागेल. या सामन्यावर इंग्लंड आणि पाकच्या सेमीफायनल प्रवेशाचं गणित ठरणार आहे.

न्यूझीलंडने आतापर्यंत 8 सामन्यात 5 विजयासह 11 गुण मिळवले आहेत. एका सामन्यात पावसाने खोडा घातला. त्यांचा पुढचा सामना इंग्लंडशी होणार आहे. यात पराभव झाल्यास इतर संघांच्या कामगिरीवर त्यांना अवलंबून रहावं लागेल. पाकिस्तानने पुढच्या सामन्यात विजय मिळवला तर त्यांचेही 11 गुण होतील. पण धावगतीच्या जोरावर न्यूझीलंड वरचढ ठरेल.

Loading...

गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कपमध्ये फक्त एक सामना गमावला आहे. त्यांनी सेमीफायनलला जागा पक्की केली आहे. त्यांचा पुढचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे. आफ्रिका स्पर्धेतून बाहेर गेल्यामुळं या सामन्यातील निकालाचा कोणत्याच संघावर फरक पडणार नाही. मात्र ऑस्ट्रेलियानं विजय मिळवल्यास गुणतक्त्यात ते अव्वल राहतील आणि चौथ्या क्रमांकावरील संघाशी त्यांचा सामना होईल.

वर्ल्ड कपमध्ये भारताने 6 सामने जिंकले असून एक पराभव तर एक सामना पावसाने रद्द झाला. भारताचे 13 गुण झाले एक सामना श्रीलंकेशी होणार आहे.

इंग्लंडने भारताविरुद्ध विजयासह 10 गुण मिळवून स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवलं आहे. त्यांचे 8 सामन्यात 5 विजय आणि 3 पराभव झाले आहेत. पुढचा सामना न्यूझीलंडशी असून त्यात विजय मिळवावाच लागेल. इंग्लंडला गेल्या 27 वर्षांत न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड कपमध्ये एकही विजय मिळवता आलेला नाही. सेमीफायनलला पोहचण्यासाठी त्यांना किमान 12 गुण मिळवावे लागतील. या सामन्यात पराभव झाल्यास त्यांना पाक-बांगलादेश यांच्या सामन्यावर अवलंबून रहावं लागेल.

 बांगलादेशने वर्ल्ड कपमध्ये जबदस्त कामगिरी करत आतापर्यंत दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तानला पराभूत केलं.पण भारतासमोर त्यांचा निभाव लागला नाही. त्यामुळे 8 सामन्यात त्यांचे 7 गुण झाले असून पुढच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध लढायचे आहे. यात विजय मिळवल्यास पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडेल.

लंकेनं इंग्लंडला पराभूत करून 6 गुण मिळवत आपणही शर्यतीत असल्याचा इशारा दिला होता.मात्र दक्षिण आफ्रिकेनं त्यांच्या सेमीफायनलमधील आशा संपुष्टात आणल्या. आता वेस्ट इंडिजलविरुद्ध विजयानंतर त्यांचा पुढचा सामना भारताशी आहे.

पाकिस्तानची वर्ल्ड़ कपमधील कामगिरी चढ-उतारांनी भरलेली आहे. वेस्ट इंडिजकडून पराभव झाल्यानंतर त्यांनी इंग्लंडविरुद्ध विजय मिळवला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि भारताविरुद्ध पराभव झाल्यानंतर दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानला पराभूत केलं. त्यांचा पुढचा सामना बांगलादेशशी होणार आहे. यात त्यांना विजय मिळवावा लागेल तरच ते सेमिफायनलला पोहचू शकतात. त्याशिवाय न्यूझीलंडचा विजय झाला तरच पाकला संधी मिळेल.

वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांचं वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. चौथ्या क्रमांकासाठी इंग्लंड, पाक आणि बांगलादेश यांच्यात स्पर्धा आहे.

वर्ल्ड कपची बाद फेरी 9 जुलैला सुरू होणार आहे. पहिली सेमीफायनल 9 जुलैला मँचेस्टरवर होईल. त्यानंतर दुसरा सामना 11 जुलैला होणार आहे. तर अंतिम सामना लॉर्ड्सवर 14 जुलैला होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 3, 2019 07:40 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...