बर्मिंगहम, 03 जुलै : बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पंचाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत विराट कोहली पुन्हा एकदा पंचाशी भिडला. बांगलादेशचा फलंदाज सौम्या सरकारचे पायचितचे अपिल फेटाळून लावल्यानंतर भारताने डीआरएस घेतला होता. त्यावेळी तिसऱ्या पंचांनीसुद्धा फलंदाजाला नाबाद ठरवलं. यानंतर कोहलीने पंचांशी चर्चा केली. याबद्दल आता सोशल मिडियावर थर्ड अंपायर अलीम दार यांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कोहलीला पंचाशी हुज्जत घालणं महागात पडू शकतो. अफगाणिस्तानविरुद्धही कोहलीने पंचाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. त्याबद्दल कोहलीला दंडही झाला होता. त्यासह एक डिमेरिट पॉइंट कोहलीला देण्यात आला होता. आता आणखी एक पॉइंट त्याला वर्ल्ड कप सामन्यातून बाहेर करू शकतो. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना 12 व्या षटकात मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर सौम्या सरकारच्या पॅडवर चेंडू आदळला. यावर भारताने केलेलं अपील पंचांनी फेटाळून लावलं. त्यावेळी कोलहीने शमीसोबत चर्चा करून डीआरएस घेतला. पण रिप्लेमध्ये चेंडू पॅडला लागला की बॅटला ते स्पष्ट झालं नाही. यानंतर थर्ड अंपायर आलीम दार यांनी फलंदाजाला नाबाद ठरवलं. डीआरएसनंतर नाराज झालेल्या कोहलीने पंचांना जाऊन आपलं मत सांगितलं. त्यावेळी बराच वेळ कोहली पंचांसोबत चर्चा करत होता. आयसीसीच्या नियमानुसार पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करणं किंवा हुज्जत घालणं आचारसंहितेचा भंग ठरतो. त्यामुळे यावर कारवाई केली जाऊ शकते. याआधी कोहलीला दंड झाला आहे. आता आणखी एक डीमेरिट पॉइंट झाल्यास त्याला एका किंवा दोन सामन्याची बंदी घातली जाऊ शकते. World Cup : शंकरची दुखापत संशयाच्या भोवऱ्यात, BCCIनं दिलं कामगिरीचे फळ? World Cup : शंकर आऊट मयंक इन! रहाणेनं निवृत्ती घेतली का? SPECIAL REPORT : भगव्या जर्सीमुळे टीम इंडियाचा पराभव?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.