बर्मिंगहम, 02 जुलै : भारताचा सलामीवीर हिटमॅन रोहित शर्मा सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. त्यानं वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशविरुद्ध त्यानं शतक साजरं केलं. रोहितनं 104 धावांची खेळी केली. यासह स्पर्धेत 500 धावाही पूर्ण केल्या आहेत. बांगलादेशविरुद्ध तमीम इक्बालनं रोहितला जीवदान दिलं. आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये रोहितला जीवदान देणं प्रत्येक संघाला महागात पडलं आहे. त्याला 7 पैकी 5 सामन्यात जीवदान मिळालं आहेत. त्यापैकी चारवेळा शतक तर एकदा अर्धशतक केलं आहे. भारताने पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला. या सामन्यात आफ्रिकेचा कर्णधार डुप्लेसीने रोहितचा झेल सोडला. त्यानंतर रोहितनं नाबाद 122 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाथन कूल्टर नाइलने झेल सोडल्यानंतर रोहितनं 57 धावा केल्या होत्या. पाकिस्तानलासुद्धा रोहित शर्माला लवकर बाद करण्याची संधी मिळाली होती. मात्र फकर जमानने त्याला धावबाद करण्याची संधी गमावली आणि रोहितनं 140 धावांची तडाखेबाज खेळी केली. इंग्लंडविरुद्ध भारताला विजय मिळवता आला नाही. या सामन्यात रोहितनं शतक केलं. जो रूटने त्याचा झेल सोडला होता. त्यानंतर रोहितनं 102 धावांची खेळी केली होती. बांगलागेशविरुद्धही त्याला जीवदान मिळालं. पाचव्या षटकांत रोहितने मारलेला चेंडू तमीम इक्बालला झेलता आला नाही. त्यानंतर रोहितनं 104 धावांची खेळी केली. भारताने इंग्लंडविरुद्ध 313 धावा केल्या. सलामीची जोडी रोहित आणि राहुलनं 180 धावांची भागिदारी केली. मात्र, त्यानंतर भारताचा डाव गडगडला. रोहितनं 104 तर केएल राहुल 77 धावा करून बाद झाले. रोहित शर्मा म्हणाला, फक्त धोनीचं काम नाही तर इतरांचीसुद्धा जबाबदारी World Cup : शंकरची दुखापत संशयाच्या भोवऱ्यात, BCCIनं दिलं कामगिरीचे फळ? World Cup : शंकर आऊट मयंक इन! रहाणेनं निवृत्ती घेतली का? SPECIAL REPORT : भगव्या जर्सीमुळे टीम इंडियाचा पराभव?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.