World Cup : इंग्लंडमध्ये सुरक्षित नाही भारतीय संघ, ICCने केले हात वर

सुत्रांच्या माहितीनुसार आयसीसी भारतीय संघ व्यवस्थापनेवर नाराज आहे. त्यामुळं भारतीय संघाची सुरक्षा वाढवण्यात आलेली नाही.

News18 Lokmat | Updated On: Jul 5, 2019 08:14 AM IST

World Cup : इंग्लंडमध्ये सुरक्षित नाही भारतीय संघ, ICCने केले हात वर

इंग्लंड, 5 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये भारतीय संघाने शानदार कामगिरी केली आहे. यामुळेच भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. वर्ल्ड कपच्या इतिहासात आतापर्यंत सातवेळा भारताने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताची सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध लढत होऊ शकते. मात्र आता त्या आधीच आता भारतीय संघ इंग्लंडमध्ये असुरक्षित असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. भारतीय संघाने आयसीसीकडे सुरक्षेची मागणी केली होती, मात्र आयसीसीने अद्याप यावर ठोस पाऊले उचलली नाही आहेत.

सुत्रांच्या माहितीनुसार भारतीय संघ व्यवस्थापन आयसीसीवर नाराज आहे. इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्याच्याआधी काही चाहत्यांनी हॉटेलमध्ये दंगा केला होता. त्यानंतर भारतीय संघाने सुरक्षेची मागणी केली होती. भारतीय संघाच्या सुरक्षेच्या मागणीवर आयसीसीने खेळाडूंची सुरक्षा महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले होते.

आयसीसीच्या काही अधिकाऱ्यांनी आईएएनएसशी बोलताना, 'सुरक्षेच्या बाबतीत तुम्हाला कोणतीही माहिती देणार नाही. मात्र आम्ही नियुक्त केलेल्या टीमने हॉटेलची पडताळणी केली होती. तसेच आवश्यकतेनुसार सुरक्षेत बदल करण्यात आले आहेत'. मात्र अद्यापही संघाची सुरक्षा वाढवण्यात आलेली नाही.

भारत सेमीफायनलमध्ये कोणाविरुद्ध भिडणार

वर्ल्ड कपमध्ये भारताने आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत. यातील 5 सामन्यात विजय मिळवला आहे. तर इंग्लंडविरोधात भारताला सामना गमवावा लागला होता. तसेच न्यूझिलँड विरोधात सामना पावसामुळे रद्द झाला होता. भारत वर्ल्ड कपच्या लीग स्टेजमधील अंतिम सामना शनिवारी श्रीलंकेविरोधात लढणार आहे. दरम्यान, सेमीफायनलमध्ये भारतीय संघ कोणत्या संघाशी भिडणार हे ठरलेले नाही. सध्या गुणतालिकेत भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यानंतर सेमीफायनलचे चित्र स्पष्ट होईल.

Loading...

वाचा- World Cup : अफगिणस्तानच्या इकरामनं मोडला सचिनचा विश्वविक्रम!

वाचा- World Cup : युनिव्हर्सल बॉसचं अनोखं सेलिब्रेशन, चाहत्यांनी वाजल्या शिट्ट्या!

वाचा- World Cup : धोनीच्या अंगठ्याला दुखापत, पुढच्या सामन्यात खेळणार की नाही?

VIDEO: अर्थसंकल्प ते क्रिडा क्षेत्रापर्यंतच्या दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 5, 2019 07:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...