World Cup : धोनीच्या अंगठ्याला दुखापत, पुढच्या सामन्यात खेळणार की नाही?

World Cup : धोनीच्या अंगठ्याला दुखापत, पुढच्या सामन्यात खेळणार की नाही?

ICC Cricket World Cup : इंग्लंडविरुद्ध खेळताना धोनीच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यानंतरही तो बांगलादेशविरुद्ध मैदानात उतरला होता.

  • Share this:

लंडन, 04 जुलै : ICC Cricket World Cup मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्याच्या अंगठ्यातून रक्त वाहत असलेले फोटोही व्हायरल झाले होते. त्यानंतर धोनीच्या दुखापतीबद्दल उलट-सुलट चर्चाही सोशल मिडियावर सुरू होती. आता अंगठ्याची जखम बरी झाली असून धोनी पूर्ण तंदुरुस्त असल्याची माहिती संघातील एका अधिकाऱ्याने आयएएनएस या वृत्तसंस्थेला दिली आहे.

धोनीच्या दुखापतीबद्दल सूत्रांनी असे सांगितले की, धोनी एक योद्धा आहे. तो 300 पेक्षा जास्त एकदिवसीय सामने खेळला आहे. त्यामुळे तुम्हाला वाटतं का की या लहान गोष्टीचा त्याला त्रास होईल. त्याच्याकडे दुखापतीतून बाहेर येण्याची क्षमता आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंगठ्याची दुखापत गंभीर नाही. त्यामुळे घाबरण्यासारखं काही नाही.

धोनीच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीबद्दल संघ व्यवस्थापनाने म्हटलं होतं की, यष्टीरक्षण करताना अंगठ्याला दुखापत होणं काही नवीन नाही. या गोष्टींचा फारसा परिणाम होत नाही. विशेष म्हणजे धोनीने दुखापतीनंत फलंदाजी करताना चांगली कामगिरी केली. त्याच्याकडून इतर खेळाडूंनी शिकलं पाहिजे.

World Cup : मैदानात झाड असेल तर पाक पोहचेल सेमीफायनलला!

धोनीला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. त्यानंतर बांगलादेशविरुद्ध तो खेळला होता. या सामन्यात त्यानं 33 चेंडूत 35 धावांची खेळी केली. तसेच यष्टीरक्षण करताना धोनीने झेलही घेतला. आता तो फिट झाला असून लंकेविरुद्ध खेळणार आहे.

World Cup : सेमीफायनलसाठी पाकिस्तानची धडपड पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही!

World Cup : सेमीफायनलमध्ये भारत पुन्हा भगव्या जर्सीत खेळणार?

SPECIAL REPORT: यशस्वी कॅप्टन कूल धोनी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार?

First published: July 4, 2019, 9:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading