World Cup : अफगाणिस्तानच्या इकरामनं मोडला सचिनचा विश्वविक्रम!

World Cup : अफगाणिस्तानच्या इकरामनं मोडला सचिनचा विश्वविक्रम!

ICC Cricket World Cup अफगाणिस्तानच्या इकराम अली खीलनं वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली.

  • Share this:

हेडिंग्ले, 04 जुलै : वेस्ट इंडीज आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक इकराम अलीने 86 धावांची अर्धशतकी खेळी केली. या खेळीसह त्याने विश्वविक्रम केला. भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकत सर्वात कमी वयात वर्ल्ड कपमध्ये एका सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम इकराम अली खीलने त्याच्या नावावर नोंदवला.

इकराम अली खीलने वर्ल्ड कप 2019च्या मध्यावर संघात घेण्यात आलं. मोहम्मद शहजादला दुखापत झाल्यानं तो संघात आला होता. याआधीच्या सामन्यात त्यानं चांगली कामगिरी केली आहे. वर्ल्ड कपमध्ये सर्वात कमी वयात 80 पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम केला आहे. त्यानं 18 वर्ष 278 दिवस वय असताना 86 धावांची खेळी केली. भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 1992 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 84 तर झिम्बॉम्बेविरुद्ध 81 धावांची खेळी केली होती. तेव्हा सचिनचे वय 18 वर्ष 323 दिवस इतकं होतं.

वर्ल्ड कपमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक कऱणारा इकराम अली पहिलाच यष्टीरक्षक ठरला आहे. याअगोदर बांगलादेशच्या मुश्फिकर रहीमने 2007 मध्ये 19 वर्ष 246 दिवस वय असताना अर्धशतक केलं होतं.

वेस्ट इंडीजने साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात विजय मिळवून स्पर्धेचा शेवट गोड केला. अफगाणिस्तानने झुंज दिली मात्र ब्रेथवेट आणि रोचच्या माऱ्यासमोर त्यांचा प्रयत्न अपुरा पडला. रहमत शाह आणि इकराम अली यांचे अर्धशतक आणि नजीबुल्लाह झारदन, असगर अफगाण यांच्या खेळीच्या जोरावर 288 धावा केल्या. रहमत शाहने 62 तर इकराम अलीने 86 धावा केल्या. इतर खेळाडूंना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. वेस्ट इंडीजक़डून ब्रेथवेटनं 4 तर केमार रोचनं 3 गडी बाद केले. गेलने इकराम अलीला बाद करून मोठा अडथळा दूर केला. या दोन्ही संघांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. अफगाणिस्तानला वर्ल्ड कपमध्ये एकही सामना जिंकता आलेला नाही. तरीही त्यांनी बलाढ्य संघांना जोरदार टक्कर दिली.

तत्पूर्वी, वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. लुईस, होप आणि पूरनच्या अर्धशतकांच्या जोरावर वेस्ट इंडिजने 50 षटकांत 6 बाद 311 धावा केल्या. अखेरचा वर्ल्ड कप सामना खेळणाऱ्या गेलला 7 धावांवर बाद करून दौलत झारदनने पहिला धक्का दिला. त्यानंतर लुईस आणि होपनं संघाच्या 100 धावा केल्या. लुईसला बाद करून राशिद खानने ही जोडी फोडली. त्यानंतर आलेल्या हेटमायरनं फटकेबाजी करण्याचा प्रयतान केला पण झारदनने त्याला बाद करून मोठा झटका दिला.

शाय होप 77 धावांवर बाद झाला. त्याला नबीने बाद केलं. होपनंतर मनिकोलस पूरन आणि जेसन होल्डरनं 105 धावांची भागिदारी केली. दोघेही 49 व्या षटकात लागोपाठ बाद झाले. त्यानंतर ब्रेथवेटनं 4 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकारासह 14 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून झारदनने 2 तर शिऱझाद, नबी आणि राशिदने प्रत्येकी एक विकेट घेतली.

World Cup : सेमीफायनलसाठी पाकिस्तानची धडपड पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही!

World Cup : सेमीफायनलमध्ये भारत पुन्हा भगव्या जर्सीत खेळणार?

SPECIAL REPORT: यशस्वी कॅप्टन कूल धोनी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार?

First published: July 5, 2019, 7:04 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading