ICC Cricket World Cup मध्ये ख्रिस गेलला फलंदाजीत कमाल करता आली नाही. पण त्याने क्षेत्ररक्षण करताना झेल घेतल्यानंतर केलेल्या सेलिब्रेशननं पुन्हा सर्वांची मने जिंकली आहेत.
ख्रिस गेलनं अफगाणिस्तानच्या रहमत शाहचा झेल घेतल्यावर मैदानावर पुश अप्स मारल्या. रहमत शाहने ब्रेथवेटच्या गोलंदाजीवर मारलेला चेंडू गेलने झेलला. त्यानंतर ब्रेथवेट आणि गेलनं पुशअप्स मारल्या.
गेल आणि ब्रेथवेटमध्ये पुश अप्स मारण्याची स्पर्धा सुरू झाली. दोन्ही खेळाडूंनी अशा प्रकारे सेलिब्रेशन केल्यानं चाहत्यांनीसुद्धा त्यांना चीअर केलं.
2019 च्या वर्ल्ड कपमध्ये 9 सामन्यात गेलनं 30.25 च्या सरासरीनं 242 धावा केल्या. यात त्याला फक्त 2 अर्धशतकं करता आली.